Join us  

Jawed Habib Hair Care Tips : केस कोरडे झालेत, फार गळतात? जावेद हबीबनं सांगितला दाट केसांसाठी बेस्ट उपाय; स्पा करण्याची काही गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:23 PM

Jawed Habib Hair Care Tips : केस जरा खराब दिसत असतील तर पार्लरमध्ये जाऊन स्पा साठी ७०० ते १००० रूपये खर्च करावे लागतात. तरीसुद्धा मनासारखा परिणाम दिसत नाही. दोन, तीन दिवसांनी केस पुन्हा जैसे थे!  

ठळक मुद्देकेसांवर व्हॅसलीन लावण्याच्या या पद्धतीला 'व्हॅसलीन हेअर स्पा' म्हणणे जावेद हबीब यांना आवडते. जावेद सांगतात की, ज्यांना कोरड्या, निर्जीव आणि अतिशय गुंतलेल्या केसांची समस्या आहे, त्यांनी घरच्या घरी व्हॅसलीन लावून केसांना असा स्पा नक्की करून पाहावा.

केसांची निगा राखण्यासाठी जावेद हबीब (Jawed Habib) नेहमीच वेगवेगळ्या टिप्स सुचवत असतात. कधी कधी त्यांचे उपाय खूप सोपे आणि घरच्याघरी करता येतील असे असतात. बाहेरचं वातावरण, शरीरातील पोषक घटकांचा अभाव यामुळे अनेकांचे केस कोरडे पडतात. ज्यांचे केस खूप कोरडे, रफ झालेत अशा लोकांसाठी जावेद हबीब यांनी मस्त उपाय (Hair care Remedies) सुचवला आहे. ऐरवी केस जरा खराब दिसत असतील तर पार्लरमध्ये जाऊन स्पा साठी ७०० ते १००० रूपये खर्च करावे लागतात. तरीसुद्धा मनासारखा परिणाम दिसत नाही. दोन, तीन दिवसांनी केस पुन्हा जैसे थे!  (How to stop Hairfall)

केस खूप तुटत असतील आणि कोरडे झाले असतील (Damage hairs) तर तुम्हीही  जावेद हबीबनं सुचवलेला हा सोपा उपाय नक्की ट्राय करू शकता. केस गळती कशी टाळायची याचे वर्णन करताना जावेद हबीब सांगतात की, ''तुमच्या केसांसाठी  व्हॅसलीन हा सर्वोत्तम उपाय आहे. जर कंगवा तुमच्या केसांमध्ये गुंतायला लागला असेल, तर तुमच्या केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. कारण तुमचे केस खूप पातळ आणि कमकुवत झाले आहेत. या स्थितीवर हा सोपा उपाय फायदेशीर ठरतो.''

केसांवर  व्हॅसलीन लावण्याची योग्य पद्धत (How to repair damge hairs) 

- सर्व प्रथम, कंगव्याने आपले केस पूर्णपणे विंचरा.

- खूप हळू आणि हलक्या हातांनी केस विंचरा. कंगव्याने केसांचा गुंता काढणं खूप वेदनादायक असल्यास, बोटांनी केसांतील गुंता सोडवा.

- यानंतर केसांना वेगवेगळ्या भागात विभागून त्यावर पाणी स्प्रे करा. तुम्हाला तुमचे केस 80 टक्के ओले करावे लागतील.

- तुमचे केस जितके जास्त गुंतलेले असतील, तितके लहान भाग तुम्हाला विभाजित करून व्हॅसलीन लावावे लागेल.

चेहरा तेलकट, मानेवर काळपटपणा आलाय? ग्लोईंग त्वचेसाठी घरीच फक्त १० मिनिटात असं करा फेशियल

केसांना फक्त तळाशी व्हॅसलीन लावावे लागेल. म्हणजेच ते फक्त केसांच्या लांबीवर लावा, टाळूवर किंवा केसांच्या मुळांवर नाही. हे व्हॅसलीन 30 ते 40 मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस हर्बल शाम्पूने धुवा. हेअर स्पा सारखा प्रभाव तुमच्या केसांवर दिसेल.

 केस फार पांढरे झालेत? मग डोक्यावरचा एकही केस पांढरा उरणार नाही, फक्त शॅम्पूत मिसळा ही गोष्ट

केसांवर व्हॅसलीन लावण्याच्या या पद्धतीला 'व्हॅसलीन हेअर स्पा' म्हणणे जावेद हबीब यांना आवडते. जावेद सांगतात की, ज्यांना कोरड्या, निर्जीव आणि अतिशय गुंतलेल्या केसांची समस्या आहे, त्यांनी घरच्या घरी व्हॅसलीन लावून केसांना असा स्पा नक्की करून पाहावा.

टॅग्स :केसांची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य