जावेद हबीब केसांशी निगडीत लोकांच्या मनातील गैरसमज नेहमीच दूर करतात. इतकंच नाही तर केसांच्या चांगल्या वाढीसाठी काय चूक काय बरोबर याची उदाहरणासह माहिती देतात. सध्या पार्लरला जाऊन स्पा करताना अनेकजण केसांना स्टीम देतात. (How to get long hairs) तर काहीजण घरीत गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून केसांना वाफ देण्यासाठी गुंडाळतात. जावेद यांच्या म्हणण्यानुसार असं करणं केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. यामुळे तुमचे केस लवकर खराब होऊ शकतात. (Hair Care Tips)
जावेद सांगतात की, केसांना स्टिम घेणं किंवा हॉट टॉवेलनं गुंडाळणं केसांचं नैसर्गिक तेल शोधून घेते. केसांना चमकदार बनवण्यासाठी तसंच बळकटीसाठी लोक केसांना स्टिम देतात. केसांमध्ये मसाज केल्यानंतर वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. पण हेअर एक्सपर्ट जावेद हबीब या दोन्ही गोष्टींसाठी नकार देतात. जावेद सांगतात आपल्या केसांच्या बाबतीत हे तीन गैरसमज खूप सामान्य आहेत. जास्तीत जास्त लोक यावर विश्वास ठेवून आपल्या केसांवर चुकीचे प्रयोग करतात.
१) केसांच्या मुळांवर तेल लावून लावणं
२) तेल गरम करून केसांना लावा
३) केसांना स्टिम देण्यासाठी हॉट टॉवेल केसांवर लपेटणं.
केस गळून गळून खूप पातळ झालेत? 'या' ट्रिक्सनी मिळवा दाट, लांबसडक केसांचा लूक
केसांना नुकसान का पोहोचतं
वाफ घेतल्यानं केसाचं नैसर्गिक तेल सुकून केस कोरडे आणि कमकुवत बनतात. गरम तेलामुळे केस डॅमेज होऊ शकतात. याशिवाय केसांच्या मुळांना हे तेल लावल्यानं नैसर्गिक तेलासह रिएक्शन होऊन केसांमध्ये कोंडा तयार होऊ शकतो. या ३ कारणांमुळे जावेद नेहमी तेल लावण्यास, तेल गरम करण्यावर आणि केसांवर स्टिम घेण्यास मनाई करतात.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत
जावेद सांगतात की तेल केस वाढवणे किंवा नवीन उगवणे नाही तर तेल फक्त केसांना ओलावा देण्याचे काम करते. तेलानं डिहायड्रेशन कमी होते जेणेकरून केस कोरडे आणि कमकुवत होत नाहीत. त्यामुळे केसांच्या मुळांना नव्हे तर त्यांच्या लांबीवर तेल लावावे. केसांच्या लांबीला हलक्या हाताने तेल लावा आणि अर्ध्या तासानंतर शॅम्पू करा.