आठवड्यातून एकदा किंवा २ वेळा मुली केस धुतात. काहीजणांना केस धुण्याच फारच कंटाळा येतो कारण केस गळणं काही थांबत नाही. (How To Wash Hairs Properly) केस धुतल्यानंतर केस कमकुवत झाल्यासारखे घरभर गळतात आणि पसरतात. केस गळतीचा त्रास टाळण्यासाठी केस धुण्याची योग्य पद्धत प्रत्येकालाच माहित असायला हवी. (Right Way To Shampoo Your Hairs By Hair Expert Jawed Habib)
तुम्ही केस कसे विंचरता, किती वेळा विंचरता, कोणतं तेल केसांना लावतात, कोणत्या तेलाने केसांची मसाज करता, शॅम्पू कुठला वापरता हे केसांची चांगली वाढ होण्यासाठी फार महत्वाचे असते. कारण रोजच्या जीवनात केसांची काळजी घेण्यात जर तुम्ही काही चुका केल्या तर केस पातळ होत जातात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस धुण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत सांगितले आहे. (How To Wash Hairs)
जावेद हबीब सांगतात की मी जिथेही प्रवास करतो, सेमिनार करतो लोकांचा एक साधा प्रश्न असतो की केस कसे धुवावेत. कारण बाजारातील सर्व कंपन्या आपल्या ब्रॅण्डचे शॅम्पू विकण्यात व्यस्त असतात कोणीही शॅम्पूचा वापर कसा करावा याबाबत सांगत नाही. जर तुम्हाला आपले केस आयुष्यभर सुंदर दिसावेत, हेअर फॉल होऊ नये असं वाटत असेल हा सोपा फॉर्म्यूला शिकणं फार महत्वाचे आहेत.
ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर दिसतो? किचनमधला 'हा' पदार्थ लावा, डाग-पिंपल्स २ मिनिटांत दूर
केस धुण्याची योग्य पद्धत कोणती? (Which Right Way To Wash Hairs)
जर तुमचे केस मोठे असतील तर आधी प्रेस करून घ्या किंवा केस आधी ओले करा नंतर तेल लावा, तुम्हाला सुट होईल त्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. जावेद हबीब यांच्या म्हणण्यानुसार मोहोरीच तेल सर्वात उत्तम ठरते. १० मिनिटांसाठी तेल तसंच लावलेलं राहू द्या. त्यानंतर केस धुण्याची प्रोसेस सुरू करा. केसांना शॅम्पू लावताना स्काल्पवर व्यवस्थित लावा बोटांनी रगडून घ्या. जेणेकरून स्काल्पवर साचलेला घाम निघून जाईल.
भारतात उष्ण हवामान जास्त असल्यामुळे भरपूर घाम येतो. जास्त घाम जमा झाल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. ज्यामुळे केस पांढरे होतात आणि केस तुटतात देखील. 'कोंडा हा केसांसाठी विष' आहे. जेव्हाही तुमच्या केसांमध्ये खाज येत असेल तर समजून जा की तुमचे केस गळणार आहेत. म्हणून रोज केस धुवा पण योग्य पद्धतीने धुवा.
केस धुण्यासाठी उत्तम शॅम्पू कोणता? (Which Shampoo Is Best For Hair Wash)
तेलावर जेव्हा तुम्ही कोणताही शॅम्पू अप्लाय करता तेव्हा तुमचा महागडा शॅम्पूसुद्धा साधाच होतो. म्हणून केसांना खूप महागडा शॅम्पू लावल्याने केस चांगले होतात हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही केस जितके जास्त धुवाल तेव्हढे जास्त वाढतील पण त्यासाठी शॅम्पू लावण्याची काही गरज नाही.