Join us  

केस पातळ झाले-वाढतच नाहीत? 'या' २ गोष्टी केसांना कधीच लावू नका; जावेद हबीबचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 9:08 AM

Jawed Habib Shares Winter Hair Care Tips : केस जास्त पातळ होऊन टक्कल दिसण्याआधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे केस म्हातारपणापर्यंत खराब होणार नाहीत.

केस वाढवणं आणि लांब केस मेंटेन ठेवणं सर्वांनाच जमत नाही. (Hair Fall Control Tips) केस सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी हेअर कलर, हायलाईट, हेअर स्ट्रेटनिंग अशा ट्रिटमेंट्स करतात. (Tips To Control Hair Fall By Hair Expert Jawed Habib) त्यामुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य कमी होते आणि कालांतराने केस गळू लागतात. केस जास्त पातळ होऊन टक्कल दिसण्याआधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे केस म्हातारपणापर्यंतही खराब होणार नाहीत. (Hair Care Tips By Hair Expert Jawed Habib)

हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी, केसांच्या उत्तम आरोग्याासाठी कोणत्या २ चुका टाळाव्यात याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  यात त्यांनी २ कॉमन चुका सांगितल्या आहेत ज्या जवळपास सर्वचजण करतात.  याचे कारण  समजावून घेऊन जर तुम्ही वेळीच या चुका करणं टाळलं तर केस अजिबात खराब होणार नाही.

जावेद हबीब सांगतात जर तुम्हाला दाट केस हवे असतील तर सगळ्यात आधी २ गोष्टी करायला हव्यात. काही हेअर केअर उत्पादनांच्या वापरामुळे केसांचे नुकसान होऊ शकतं म्हणून अशा उत्पादनांचा वापर करणं टाळतात. हेअर स्ट्रेटनरचा वापर टाळा कारण यात हिट असते. असे कोणतेही हेअर केअर प्रोडक्ट यात हिट असते याचा वापर केसांवर करू नका.

दुसरं म्हणजे केमिकल्स बेस्ड प्रोडक्टसचा केसांवर वापर करू नका. केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या संपर्कात केस आल्यामुळे जास्त डॅमेज होतात.  केसांची गुणवत्ता खराब होते याशिवाय केस गळण्याचाही धोका असतो. त्यातील हानीकारक घटक केसांच्या ओव्हरऑल वाढीवर परिणाम करतात. ज्यामुळे केस  व्यवस्थित वाढू शकत नाही. केसांना फाटे फुटणं, केस गळणं असे साईड इफेक्ट्स उद्भवतात. 

केस लवकर वाढवण्यासाठी जावेद हबीबच्या खास टिप्स (Jawed Habib Shares Winter Hair Care Tips, From Trims to Pre-Conditioning)

1) प्री कंडिशनिंग-  केस धुण्याच्या  ५ ते १० मिनिटं आणि केसांना केसांना तेल लावा जेणेकरून किंवा पोषण मिळेल आणि  केस धुताना जास्त तुटणार नाहीत.

२) ट्रिमिंग- केस वाढू लागले किंवा केसांना फाटे फुटले असतील तर ट्रिम करायला विसरू नका. जर ८ ते १० आठवड्यांनी केस ट्रिम करा. ज्यामुळे केसांची लेंथ चांगली वाढेल.

सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा गव्हाच्या पीठाचा खास उपाय करा, लांब-दाट होतील केस

३) गरम पाणी टाळा- जर तुमचे केस रोज गळत असतील तर त्यावर गरम पाण्याचा वापर करणं टाळा. गरम पाण्याने केस जास्त ड्राय होतील किंवा सतत तुटत राहतील.

४) कांद्याचा रस - कांद्याचा रस केसांसाठी अनेकदृष्या फायदेशीर ठरतो.  केस धुण्यापूर्वी ५ मिनिटं आधी कांद्याच्या रसाने केसांची मसाज केल्यास केस मजबूत होतात.

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

५) क्लिप्स, हेअरबॅण्ड्स- केस बांधण्यासाठी तुम्ही जे काही साहित्य वापरत आहारात ते घट्ट नसावे.  क्लिप्स किंवा रबर फार घट्ट  असेल तर तुमचे केस गळू शकतात. यामुळे हेअर फॉल वाढू शकतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी