सुंदर केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलून येते. (Tips For Long Hairs) केस दाट-चमकदार असतील तर प्रत्येकालाच ते आवडतात. हिवाळ्याच्या दिवसात केस कमकुवत होतात आणि जास्त प्रमाणात तुटतात. (Kes galti var upay) थंडीच्या दिवसांत केसांमध्ये कोंडा होतो आणि केस जास्त प्रमाणात गळतात. अशावेळी केस ड्राय आणि कमकुवत होऊ शकतात. कारण यातील नॅच्युरल ऑईल कमी होऊ लागतं आणि केसांमध्ये फोड येतात तर कधी कोंड्याचे प्रमाण वाढते. (Jawed Habib Hair Care Tips For Hair Growth)
हेअर एक्सपर्ट् जावेद हबीब (Jawed Habib) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हिवाळ्यात केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. अनेकदा हिवाळ्याच्या दिवसांत केस खूपच कोरडे दिसू लागतात. केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. कोणत्या तेलाने मसाज करावी यात लोक बरेच कन्फ्यूज असतात. जावेद हबीब यांनी काही हेअर केअर टिप्स शेअर केल्या आहेत. (Jawed Habib Shares Winter Hair Care Tips For Hair Growth)
केसांमध्ये जास्त कोंडा झाला असेल तर काय करावे?
मुलगा असो किंवा मुलगी हिवाळ्याच्या दिवसात सर्वांच्याच केसांवर कोंड्याचा एक जाडसर लेअर तयार होतो. जावेद हबीब सांगतात की हिवाळ्याच्या दिवसात जर तुम्ही गरम पाण्याने केस धुतले तर केसांमधील मॉईश्चर कमी होते. ज्यामुळे केस जास्त कोरडे आणि डल होतात. गरम पाण्याचा वापर टाळून थंड पाण्याने केस धुवायला हवे. यामुळे केस तुटणार नाहीत.
केसांसाठी शॅम्पू कोणता वापरावा?
आपला स्काल्प क्लिन ठेवण्यासाठी रोज शॅम्पूने केस धुवायला हवेत. कोणता शॅम्पू वापरावा असं कनफ्यूजन तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही कोणताही सौम्य शॅम्पू वापरू शकता. तेल लावलेल्या केसांवर शॅम्पू लावून रगडून स्वच्छ करा. जावेद हबीब सांगतात की केस रोज शॅम्पूने स्वच्छ धुवायला हवेत. पण आधी केसांना तेल लावा. राईचे तेल केसांना लावून कंगव्याने केस विंचरून घ्या केस ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा नंतर शॅम्पूने स्वच्छ धुवा.
पन्नाशीनंतरही तरूण कसं दिसायचं? नियमित ६ पदार्थ खा; सुरकुत्या-सैल त्वचा अजिबात होणार नाही
याशिवाय नारळाचे तेल हा केसांसाठी उत्तम उपाय आहे. जावेद हबीब सांगतात की धुण्याच्या काहीवेळ आधी केसांना हे तेल लावून ठेवा नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेल्या या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे केस जराही गळणार नाहीत आणि कोंड्याच्या समस्येवरही आराम मिळेल, केस मऊ-मुलायम होतील.