Lokmat Sakhi >Beauty > चेहरा काळा पडला? जावेद हबीब सांगतात अर्धा बटाटा घेऊन 'हा' उपाय करा; 2 मिनिटांत ग्लो येईल

चेहरा काळा पडला? जावेद हबीब सांगतात अर्धा बटाटा घेऊन 'हा' उपाय करा; 2 मिनिटांत ग्लो येईल

Jawed Habib Skin Whitening Tips : बटाटा पोषक तत्वांचा खजिना आहे. यात व्हिटामीन आणि खनिजांपासून एंटीऑक्सिडेंट्स आणि सूदविरोधी गुण असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 01:04 PM2024-08-04T13:04:58+5:302024-08-04T13:08:28+5:30

Jawed Habib Skin Whitening Tips : बटाटा पोषक तत्वांचा खजिना आहे. यात व्हिटामीन आणि खनिजांपासून एंटीऑक्सिडेंट्स आणि सूदविरोधी गुण असतात.

Jawed Habib Skin Whitening Tips : Home Remedies According To Skin Type By Jawed Habib | चेहरा काळा पडला? जावेद हबीब सांगतात अर्धा बटाटा घेऊन 'हा' उपाय करा; 2 मिनिटांत ग्लो येईल

चेहरा काळा पडला? जावेद हबीब सांगतात अर्धा बटाटा घेऊन 'हा' उपाय करा; 2 मिनिटांत ग्लो येईल

ऊन्हामुळे चेहऱ्याचा रंग काळा पडलाय अशी अनेकांची तक्रार असते. एकदा चेहऱ्याचा रंग बिघडला झाला तर कितीही प्रयत्न केले तरी चेहऱ्याचा रंग उजळत नाही. (Skin Tanning Solution) जवळपास १५ दिवस चेहऱ्यावर टॅनिंग तसंच राहतं. चेहरा डल दिसत असेल तर पर्सनॅलिटीवरसुद्धा परिणाम होतो. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी काही घरगुती उपायही करून पाहायला हवेत. प्रसिद्ध  ब्युटी एक्सपर्ट, हेअरस्टायलिश  जावेद हबीब (Jawed Habib) सोशल मीडियावर नेहमीच केस आणि त्वचेच्या समस्यांशी संबंधित गोष्टी शेअर करत असतात. (Best Fecial According To Skin Type By Jawed Habib)

केस दाट होण्यासाठी, केस गळणं थांबवण्यासाठी तसंच चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी वेगवेगळे उपाय जावेद हबीब सांगत असतात. इंस्टग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी चेहरा स्वच्छ ठेवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Best Skin Care Tips According To Skin Type By Jawed Habib)

जावेद हबीब सांगतात की एक बटाटा घ्या आणि मधोमध कापून घ्या. बटाट्याने पूर्ण ५ मिनिटं आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याचे चेहरा धुवा. या उपायाने तुमचा चेहरा चमकदार दिसेल. काया क्लिनिकच्या रिपोर्टनुसार बदामात कॅटेकोलेज आणि कोजिक एसिड यांसारखी नैसर्गिक संयुगे असतात. ज्यामुळे चेहऱ्याचे काळे डाग निघून जातात. (Ref) बटाट्याचा फेस मास्क तुमच्यासाठी उत्तम आहे. बटाट्याचा फेस मास्क नियमित चेहऱ्याला लावाल्याने डाग हलके होण्यास मदत होईल आणि वजनही कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते.


बटाटा पोषक तत्वांचा खजिना आहे. यात व्हिटामीन आणि खनिजांपासून एंटीऑक्सिडेंट्स आणि सूदविरोधी गुण असतात.  ज्यामुळे त्वचेची काळजी  घेण्यास मदत होते. बटाट्याचा रस  समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम उपाय आहे. बटाट्याच्या रसाने चेहऱ्यावरचे डाग निघण्यासही मदत होते. 

पोट, मांड्या फार सुटल्यात? जेवणात 'ही' भाजी खा, पोटावरची चरबी होईल कमी-स्लिम दिसाल

टॅनिंग निघते

बटाट्यात एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे स्किन दीर्घकाळ तरूण चांगली राहण्यास मदत होते. टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बटाटा चेहऱ्याला लावू शकतात. सगळ्यात आधी १ बटाटा घेऊन त्याचे साल काढा. त्यानंतर बटाटा बारीक करून घ्या. नंतर एका वाटीत लिंबाचा रस, थोडं दूध आणि बेसन घालून मिक्स करा आणि व्यवस्थित चेहऱ्याला लावा. २० मिनिटं सुकू द्या. नंतर चेहऱा स्वच्छ पाण्याने धुवा. 

पिग्मेंटेशन कमी होते

बटाट्यातील पोटॅशियम स्किनवर डाग, पिग्मेंटेशन कमी करण्यास फायदेशीर ठरते. बटाट्याचा रस त्वचेवर लावल्याने टॅनिंग, डार्क स्पॉट्स कमी होतात. यातील व्हिाटामीन बी-६ एजिंगची समस्या टाळण्यास मदत करतात. जर तुम्ही बटाट्याचा रस आठवड्यातून ३ ते ४ वेळा चेहऱ्याला लावाल तर फाईन लाईन्स, सुरकुत्या, वाढत्या वयाचा परिणाम जाणवणार नाही. 

Web Title: Jawed Habib Skin Whitening Tips : Home Remedies According To Skin Type By Jawed Habib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.