तुमचे केससुद्धा पक्ष्यांच्या घरट्यासारखे विस्कटलेले, कोरडे झाले असतील तर काळजी करू नका किंवा जबरदस्तीने केसांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण असे केल्याने तुमचे केस कमकुवत होतील, तुटतील. त्यामुळे केसांवर जबरदस्ती करून तुमचा त्रास वाढवू नका. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी (Jawed Habib Tips For Frizzy Hair) दिलेल्या सोप्या घरगुती उपायांनी तुमचे केस (Hair Care Tips) एका वॉशमध्ये गुळगुळीत आणि रेशमी बनवा.
तुमचे कोरडे, गुंतलेले केस एकाच वेळी सरळ करण्यासाठी जावेद हबीब सांगतात की तुम्हाला केसांवर ग्लिसरीन लावावं लागेल. होय, तेच ग्लिसरीन जे तुम्ही तोंडाचे व्रण बरे करण्यासाठी वापरता. हे ग्लिसरीन कोरफड जेलमध्ये मिसळून, तुम्हाला एक परिपूर्ण मिश्रण तयार करावे लागेल. हे मिश्रण ब्रशच्या मदतीने केसांच्या खालच्या भागावरच लावा. केसांच्या मुळांवर लावू नका.
केसांना ग्लिसरिन लावण्याची योग्य पद्धत
तुमच्या केसांच्या लांबीनुसार एलोवेरा जेल एका भांड्यात काढा. तुम्ही घेतलेल्या एलोवेरा जेलच्या प्रमाणात ग्लिसरीनचा एक भाग मिसळा. साधारणपणे 3 ते 4 चमचे ग्लिसरीन लांब केसांसाठी पुरेसे असते. हे दोन्ही चांगले मिसळा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जावेद योग्य मिश्रणावर खूप जोर देतो.
जेव्हा हे मिश्रण तयार होईल, तेव्हा तुम्ही तुमचे केस लहान-लहान भागांमध्ये विभागून घ्या आणि त्यावर ग्लिसरीनचे हे मिश्रण लावा, कंगव्याच्या मदतीने केस विंचरा. नंतर पुढच्या 20 ते 30 मिनिटांसाठी डोक्यावर शॉवर कॅप ठेवा. जर तुमच्याकडे शॉवर कॅप नसेल तर तुम्ही केसांना स्वच्छ पॉलिथिन देखील लावू शकता.
जावेद हबीब सांगतात की, बाजारात मिळणारे कोरफड जेल लावण्याऐवजी तुम्ही कोरफडीचे ताजे जेल म्हणजेच कोरफडीचे पान सोलून त्यातून ताजे जेल काढून मग त्यात ग्लिसरीन मिसळून केसांना लावले, तर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. हे मिश्रण केसांना लावल्याने तुमचे केस अगदी रेशमी आणि गुळगुळीत होतील. शॉवर कॅप 30 मिनिटे ठेवल्यानंतर, आपले केस सामान्य शॅम्पूने धुवा.