Join us  

Jawed habib tips : वर्षानुवर्ष टिकेल हेअर कलर अन् स्ट्रेटनिंग; जावेद हबीबनं सांगितली केसांचा लूक बदलण्याची भन्नाट ट्रिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 6:32 PM

Jawed habib tips : हेअर कलर करणं असो किंवा स्मुथनिंग केसांवरील कोणतीही ट्रिटमेंट जास्तीत जास्तवेळ राहण्यासाठी काही टिप्स वापराव्यात लागतात. नाहीतर खूप कमी दिवसात केस पुन्हा जशेच्या तसे दिसतात. 

ठळक मुद्देज्यांना आपल्या केसांवर सतत नवीन प्रयोग  करत राहावेसे वाटतात त्यांच्यासाठी ही ट्रिक फायदेशीर ठरेल. प्री कंडिशनिंग ट्रिक हेअर कलर  जास्तवेळ टिकून राहण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

केसांचं रिबॉन्डिंग किंवा स्ट्रेटनिंग करणं म्हणजेच तुमचे केस कुरळे, झुपकेदार कसेही असले तरी केमिकल्सच्या मदतीनं केसांना स्ट्रेट लूक देता येऊ शकतो. जास्तीत जास्त मुली सध्याच्या काळात रिबॉन्डिंग करतात. फ्रेश, कॉन्फिडेंट आणि आकर्षक लूकसाठी केसांची  ठेवण फार महत्वाची असते म्हणूनच सध्या स्ट्रेटनिंगचे महत्व फार वाढले आहे. याशिवाय पांढरे केस लपवण्यासाी सर्रास हेअर कलर्सचा वापर केला जातो. हेअर कलर करणं असो किंवा स्मुथनिंग केसांवरील कोणतीही ट्रिटमेंट जास्तीत जास्तवेळ राहण्यासाठी काही टिप्स वापराव्यात लागतात. नाहीतर खूप कमी दिवसात केस पुन्हा जशेच्या तसे दिसतात. 

तुम्ही आपल्या केसांना रंग दिला असेल किंवा सतत केसांना वेगवेगळे रंग देणं तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करावे लागतात. एक हेअर कलर केसांवरून कमी झाल्यानंतर लगेच दुसरा ट्राय केला जातो. त्यासाठीच हेअर एक्सपर्ट आणि हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबनं एक खास ट्रिक त्यांच्या चाहत्यांना सांगितली आहे.  ज्यांना आपल्या केसांवर सतत नवीन प्रयोग  करत राहावेसे वाटतात त्यांच्यासाठी ही ट्रिक फायदेशीर ठरेल. प्री कंडिशनिंग ट्रिक हेअर कलर  जास्तवेळ टिकून राहण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

1) प्री-कंडिशनिंग म्हणजे शॅम्पू करण्यापूर्वी आपल्या केसांची काळजी घेणे. म्हणजेच शॅम्पू करण्यापूर्वी केसांवर कंडिशनर लावा. तुम्ही एलोवेरा जेल किंवा केसांचे तेल कंडिशनर म्हणून देखील लावू शकता.

 2) जावेद शिफारस करतात की प्री-कंडिशनिंग तुमच्या केसांचा रंग खराब होण्यापासून वाचवते. तसेच, ज्यांनी रिबॉन्डिंग केले आहे, त्यांच्या केसांनाही प्री-कंडिशनिंगचे जास्त फायदे दिसून येतात.  

हेअर स्ट्रेटनिंग किंवा रिबॉन्डिंग

रिबॉन्डिंग करताना आपले केस पार्लर ट्रीटमेंटमध्ये सरळ केले जातात. जर तुमचे केस अनहेल्दी, फ्रिजी, कोरडे दिसत असतील तर रिबॉन्डिंग करणं उत्तम ठरेल. या ट्रिटमेंटसाठी ४ ते ६ तासांचा वेळ लागतो. केमिकल्स ट्रिटमेंटनं केसांना पूर्णपणे सरळ केलं जातं.  रिबॉन्डिंग ट्रीटमेंट तुमच्या केसांवर बराचवेळ टिकवायची असेल तर शॅम्पू करण्याआधी कंडिशनिंग करावे. प्री- कंडिशनिंग तुमच्या केसांवर लेअर म्हणून काम करते त्यामुळे शॅम्पूमुळे केसांवर होणारा परिणाम कमी होतो. 

 

प्री कंडिशननिंगचे फायदे

प्री कंडिशनिंग तुमच्या केसांचा रंग खराब होऊ देत नाही. दुसरं म्हणजे, हे तुमचे रिबॉन्डिंग दीर्घ काळासाठी प्रभावी बनविण्यात मदत करते. 

शॅम्पू करताना केसांचे नैसर्गिक तेलही काढून टाकले जाते. यामुळे केस कोरडे होतात. तर प्री-कंडिशनिंग केसांची घाण साफ करते. त्यांमुळे केसांच्या नैसर्गिक तेलाला हानी पोहोचत नाही.

शॅम्पूचे काम म्हणजे तुमच्या टाळूवरील घाण, घाम आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकणे हे आहे. परंतु या सर्व गोष्टींसाठी शॅम्पूमध्ये वापरलेली रसायने तुमच्या टाळूवरील नैसर्गिक तेल देखील काढून टाकतात. यामुळे केसांचा रंगही खराब होतो. म्हणूनच केसांची काळजी घेण्यासाठी प्री कंडिशनिंग फार महत्वाचं आहे. 

टॅग्स :हेल्थ टिप्सकेसांची काळजीआरोग्य