केसांच्या समस्या प्रत्येक वयोगटातील स्त्रियांना उद्भवतात. (Jawed Habib Tips) वातावरणात बदल झाल्यामुळे केस कधी कधी खूपच ड्राय दिसतात तर कधी विंचरताना केस घरात पसरतात. (Hair Care Tips) केस स्ट्राँग आणि लांबसडक ठेवण्यासाठी हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सोपा उपाय सुचवला आहे. जावेद हबीब यांच्यामते केस गळणं थांबवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही फक्त बेसिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Winter Special Jawed Habib Share How to take care of hair in winter)
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जावेद हबीब यांनी हिवाळ्यात केसांची कशी काळजी घ्यावी, केसांना कोणत्या प्रकारचे तेल लावावे याबद्दल सांगितले आहे. सहसा पाहिलं जातं की लोक आपल्या केसांना तेल लावायला खूप कंटाळा करतात कारण तेल लावल्यामुळे चेहरा चिपचिपीत, तेलकट दिसतो. जर तुम्हाला चांगले केस हवे असतील तर त्यासाठी केसांवर कोणतं तेल लावता हे फार महत्वाचे असते. (kes korde hou naye yasathi upay)
जावेद हबीब यांच्या हेअर केअर टिप्स (Jawed Habib's Tips For Long Hairs)
जावेद हबीब यांनी बाल भारत नावाचा एक लाईव्ह शो सुरू केला आहे. यात तेल केसांची निगा राखण्याच्या टिप्स सांगतात. यावेळी त्यांनी आपल्या दर्शकांना सांगितले की हिवाळ्याच्या दिवसात केस खूपचच ड्राय झालेले असतात. अशावेळी काय करायला हवं? याशिवाय ड्राय केसांची समस्या कशी सोडवता येऊ शकते. भारताचे तेल म्हणजेच राईचे तेल आपल्या केसांना लावावे असं ते सुचवतात. थंडीच्या दिवसात या तेलाने मसाज करा आणि १० ते १५ मिनिटांनी केस शॅम्पूने स्वच्छ धुवा.
दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना कोणते तेल वापरावे?
जे लोक दक्षिण भारतात राहतात त्यांनी आपल्या केसांना नारळाचे तेल लावाायला हवे. कारण समुद्राच्या जवळ असल्यामुळे हवेत थोड्या फार प्रमाणात मीठ असते. केसांवरील मॉईश्चर काढून टाकण्यासाठी थोडं जाड तेल लावायला हवं. जावेद हबीब यांनी सांगितले की रात्री झोपताना कधीच केसांना तेल लावू नये.
समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस
हिवळ्यात रोज केस धुवावेत का?
जर तुम्ही थंडीच्या दिवसात केस धुवायला कंटाळा करत असाल तर ही सवय आधी बदला. कारण हिवाळ्यात स्काल्प स्वच्छ ठेवणं गरजेचं असते. नाहीतर कोंडा, स्काल्प मळकट दिसणं अशा समस्या उद्भवतात. म्हणून एक दिवसाआड केसांना शॅम्पू आणि कंडिशनिंग करा.
दिवसरात्र गळून केस विरळ झाले? जास्वंदाच्या फुलाचा जादूई उपाय, विंचरायचा कंटाळा येईल इतके वाढतील केस
कोंडा काढून टाकण्यासाठी काय करावे?
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवत असेल. हे टाळण्यासाठी केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. केस हलक्या कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने केस धुवा. बाहेर पडताना केस कव्हर करून मगच बाहेर पडा जेणेकरून केसांमध्ये धुळीचे कण अडकणार नाहीत.