Lokmat Sakhi >Beauty > जावेद हबीब सांगतात घरगुती नुस्खा; आल्याच्या रसात मिसळा '१' खास तेल; केस वाढतील इतके की..

जावेद हबीब सांगतात घरगुती नुस्खा; आल्याच्या रसात मिसळा '१' खास तेल; केस वाढतील इतके की..

Jawed Habib writes: Easy home tips to make your hair grow fast by using Ginger : ५ रुपयाच्या आल्याची पाहा जादू; केस इतके भरभर वाढतील की कळणारच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 10:00 AM2024-05-31T10:00:00+5:302024-05-31T19:14:58+5:30

Jawed Habib writes: Easy home tips to make your hair grow fast by using Ginger : ५ रुपयाच्या आल्याची पाहा जादू; केस इतके भरभर वाढतील की कळणारच नाही..

Jawed Habib writes: Easy home tips to make your hair grow fast by using Ginger | जावेद हबीब सांगतात घरगुती नुस्खा; आल्याच्या रसात मिसळा '१' खास तेल; केस वाढतील इतके की..

जावेद हबीब सांगतात घरगुती नुस्खा; आल्याच्या रसात मिसळा '१' खास तेल; केस वाढतील इतके की..

आजकाल लोक केसांच्या समस्यांमुळे खूप चिंतेत असतात (Hair care Tips). काहींचे केस कोरडे होतात, काहींचे केस अकाली पांढरे होतात, झपाट्याने गळतात आणि कोंड्याची समस्या निर्माण होते (Hair Growth). अशा परिस्थितीत केस निरोगी ठेवण्यासाठी आपण ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो. पण त्यात केमिकल रसायनांचा अधिक वापर केला जातो (Jawed Habib).

केसांचे नुकसान होऊ नये म्हणून, या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती उपाय फॉलो करू शकता. हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी आल्याचा एक सोपा उपाय सांगितला आहे. या उपायामुळे केस गळती थांबेल, शिवाय केसात कोंडा आणि केस पांढरे होण्यापासूनही सुटका मिळेल. पण केसांसाठी आल्याचा वापर नेमका कसा करावा? पाहा(Jawed Habib writes: Easy home tips to make your hair grow fast by using Ginger).

जावेद हबीब सांगतात आल्याचा करा 'असा' वापर; केसगळती थांबेल

लागणारं साहित्य

केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..

आलं पावडर

खोबरेल तेल

चमकदार केसांसाठी आल्याचा करा वापर

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक टेबलस्पून आल्याची पावडर घ्या. त्यात २ चमचे खोबरेल तेल मिक्स करा. तयार मिश्रण स्काल्पवर लावा. १० मिनिटांसाठी तसेच ठेवा.

हात-पाय-मान-कोपरे काळवंडले? चमचाभर हळदीचा सोपा उपाय- टॅनिंग होईल गायब; त्वचा चमकेल

१० मिनिटानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. या पेस्टमुळे केसांची ग्रोथ तर होतेच, शिवाय केस निरोगी ठेवण्यासही मदत होते.

केसांचे आल्याचे फायद

आलं फक्त पदार्थाची चव वाढवत नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. त्यात अँटी इंफ्लामेटरी आणि अँटी मायक्रोबायल प्रोपर्टीज असतात. ज्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणात सुधारणा होते. शिवाय त्यातील अँटी फंगल गुणधर्मामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.

Web Title: Jawed Habib writes: Easy home tips to make your hair grow fast by using Ginger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.