Lokmat Sakhi >Beauty > महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...

महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...

Jawed Habib Shares Easy Tips On How To Prevent Hair Fall : केस गळणं, कोंडा या समस्यांनी छळलं असेल तर हे सोपे उपाय करुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 02:36 PM2023-07-28T14:36:31+5:302023-07-28T15:06:51+5:30

Jawed Habib Shares Easy Tips On How To Prevent Hair Fall : केस गळणं, कोंडा या समस्यांनी छळलं असेल तर हे सोपे उपाय करुन पाहा

Jawed Habib writes Repair dry and damaged hair at home. | महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...

महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...

केस हे आपल्या सौंदर्याचा महत्वाचा भाग आहे. छान, लांबसडक, दाट, काळेभोर केस असणे हे आपल्याकडे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. परंतु सध्याच्या बदलत्या काळानुसार, कुणाला केसांची समस्या नाही असे होऊच शकत नाही. केसांसंबंधित अनेक समस्या सगळ्यांनाच असतात. हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच फार कमी लोक असतील ज्यांना केसांच्या काहीच समस्या सतावत नसतील. आजकाल केसांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यावर अधिक भर देतो. यामुळे देखील काहीवेळा केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरवून जाते.  

केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय किंवा महागड्या ट्रिटमेंट्स करून बघतो. परंतु हे सर्व उपाय काहीवेळा काम करतीलच असे नाही. केसांच्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब यांच्या म्हणण्यानुसार, जर आपण काही घरगुती सोप्या उपायांचा वापर करून आपल्या रोजच्या हेअर केअर रुटीनमध्ये थोडासा बदल केला तर केसांच्या समस्या कायमच्या दूर होऊ शकतात. जावेद हबीब यांनी केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी  घरगुती सोपे ५ उपाय सांगितले आहेत, ज्याचा वापर करून आपण केसांचे आरोग्य चांगले राखू शकता(Jawed Habib writes Repair dry and damaged hair at home).

केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले राखण्यासाठी ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब सांगतात ५ उपाय... 

१. आठवड्यातून दोन वेळा केसांना कोमट तेलाने मालिश करुन घ्यावे. 

आपण जर आठवड्यातून किमान दोनवेळा संपूर्ण केसांना व केसांच्या मुळांना कोमट तेलाने मालिश केले तर ते केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. स्कॅल्पला व केसांच्या मुळांना खोबरेल तेलाने मालिश केल्यास ते केसांच्या वाढीसाठी व केसगळती कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. 

केस गळतीची समस्या कायमची संपवायची ? करा कढीपत्त्याच्या एक परफेक्ट उपाय...

२. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवळा खा. 

ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब, केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सौंदर्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला देतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे आपले केस मजबूत, घनदाट आणि चमकदार होण्यास मदत मिळते. आवळ्याच्या वापरामुळे केसांच्या मुळांना ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. आवळ्याचा वापर टाळूच्या आयुर्वेदिक उपचारांसाठीही केला जातो. यासाठीच खाण्यातून तसेच हेअर मास्कच्या माध्यमातून आपण केसांसाठी आवळा वापरू शकता.

१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!

३. केसांच्या मजबुतीसाठी ग्रीन टी पिणे उपयुक्त ठरेल. 

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अमिनो अ‍ॅसिड आणि झिंक यांसारखे पोषक घटक आढळतात, जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जातात. ग्रीन टी वापरल्याने केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. ग्रीन टी शॅम्पूने केसांना मसाज केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते, ज्यामुळे केस जाड आणि मजबूत होतात. रोजच्या डाएटमध्ये ग्रीन टी प्यायलने केसगळतीची व डोक्याला टक्कल पडण्याची समस्या कायमची दूर होते. 


 
४. आठवड्यातून एकदा केसांना एलोवेरा जेलने मसाज करावा. 

एलोवेरा जेलमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात जे केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. केसांवर याचा वापर केल्याने केसांना पोषण मिळते आणि केसांची वाढ होते. हे जेल रक्ताभिसरण वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरते. केसांवर याचा वापर केल्याने टाळूवरील खाज आणि कोंडा यापासून आराम मिळतो. यामुळे ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब आठवड्यातून एकदा केसांना एलोवेरा जेलने मसाज करण्याचा सल्ला देतात. 

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

५. आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांना कांद्याच्या रसाने मसाज करावा. 

जर आपले केस अधिकच खराब झाले असतील तर कांद्याचा रस आपले केस मजबूत व चांगले करण्याचे काम करतो. कांद्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. केसांमध्ये वेळोवेळी मसाज केल्यास खराब झालेले केसही पुन्हा चांगले होऊ शकतात. यासोबतच केस नेहमीपेक्षा जास्त गळत असतील तर, तुम्ही कांद्याचा रस वापरावा. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते जे केसांना पोषण देण्याचे काम करते. यामुळे केस मजबूत होतात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

Web Title: Jawed Habib writes Repair dry and damaged hair at home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.