घनदाट, लांबसडक, काळेभोर केस हे आपल्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारचा उठाव देतात. स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाला आपले केस सुंदर दिसावे असे कायम वाटत असते. आपले केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात आणि म्हणूनच आपण त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी वेगवेगळे शाम्पू, तेल आणि उपचार करुन पाहतो. आजकाल बरेचजण केसांच्या अनेक समस्यांनी हैराण झालेले दिसतात. केसांत कोंडा होणे, केसगळती, केस रुक्ष होणे, केसांची वाढ खुंटणे, अकाली केस पांढरे होणे अशा अनेक समस्या केसांच्या बाबतीत आपण पाहिल्याचं असतील.
केसांच्या अनेक समस्या असल्या तरीही त्यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन या समस्या दूर केल्या पाहिजेत. जर या केसांच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर केसांवर त्यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. केसांच्या या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण महागडे शाम्पू,तेल किंवा खर्चिक ट्रिटमेंट्स करून घेतात. या महागड्या ट्रिटमेंट्सचा आपल्या केसांवर कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही. यासाठीच सुप्रसिद्ध हेअर आणि ब्युटी एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी काही ब्यूटी ट्रिटमेंट्स शेअर केल्या आहेत. त्यांचा वापर करून आपण आपल्या केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा आणू शकतो(Jawed Habib writes Some common hair problems & their solutions).
जावेद हबीब सांगतात अशी घ्या केसांची काळजी...
१. अति केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरु नये :- आपल्यापैकी बरेचजण केसांचे स्टायलिंग करण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केलेली असंख्य प्रॉडक्ट्स वापरतात. याशिवाय अनुभव नसलेल्या किंवा कमी अनुभव असणाऱ्या हेअर स्टायलिस्टकडून केसांवर अनेक ट्रिटमेंट्स करून घेतात. याशिवाय केसांसाठी अनेक हिट देणाऱ्या उपकरणांचा सतत वापर करणे. अशा सगळ्या कारणांमुळे सहाजिकच केस खराब होतात. त्यामुळे असे खराब केस वाढवून ते अगदीच वाईट दिसतात, त्यामुळे असे होऊ नये म्हणून केस कापून त्यांची उंची शक्यतो कमीच ठेवावी. खराब केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केसांना प्रीकंडीशनिंग करण्यास सुरुवात करा. हेअर वॉश करण्याआधी केसांना तेल लावा.
२ चमचे आवळा पावडर- २ चमचे शिकेकाई पावडर, लावा हा हेअरपॅक - केस चटकन होतील काळे...
२. केसांची केस गळती थांबवा :- केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी जावेद हबीब म्हणतात, केस कायम स्वच्छ ठेवा, वेळोवेळी केस धुवा आणि धुण्यापूर्वी तेल लावा. केस धुण्याआधी केसांना केवळ १० मिनिटे तेल लावा. तसेच दर ८ ते १० आठवड्यांनी आपले केस ट्रिम करा. आठवड्यातून एकदा केस धुण्यापूर्वी ताज्या कांद्याचा रस डोक्याला लावून मसाज करा. तरीही केस गळत असतील तर जास्त वाट पाहू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. काहीवेळा आपल्या आरोग्याच्या इतर समस्यांमुळे केस गळणे सुरू होते, जे डॉक्टरांच्या उपचारानेच बरे होऊ शकते.
महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...
३. केसांची चमक नाहीशी झाली असेल तर :- जेव्हा आपण आपल्या केसांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा केसांचे बरेच नुकसान होते. केसांना वारंवार केमिकल ट्रिटमेंट, हिट स्टाइलिंग टूल्स आणि कंडिशनर न लावणे ही केस निर्जीव बनवणारी काही कारणे आहेत. या समस्येचा एक चांगला उपाय म्हणजे केसांची काळजी घेणे. प्रत्येकवेळी केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळांपासून ते थेट खालच्या टोकांपर्यंत केसांना तेल लावा. शक्य असल्यास, महिन्यातून एकदा तरी हेअर स्पा करुन घ्यावा. जर आपले केस फारच खराब किंवा रुक्ष झाले असतील तर ते चांगल्या स्थितीत येईपर्यंत हिटिंग टूल्स आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरणे टाळा.
१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!
४. डोक्यातील कोंडा कसा काढायचा :- कोंडा तेलकट आणि कोरडा अशा दोन प्रकारचा असतो. जर आपल्याला कोरड्या कोंड्याचा त्रास होत असेल, तर आपले केस धुण्यासाठी आठवड्यातून एकदा तुमच्या नियमित वापरायच्या शाम्पूसोबत अँप्पल सायडर व्हिनेगर वापरा. कोंड्याची समस्या असताना केस अधिक स्वच्छ ठेवा.
५. केसांचे पांढरे होणे कसे कमी करावे :- जर आपले केस लहान वयातच अधिक पांढरे होऊ लागले तर केमिकलयुक्त उपचार करणे टाळा. वाढत्या वयासोबत असे होत असेल तर त्यावर नैसर्गिक रंग किंवा मेंदी लावणे हाच सर्वोत्तम उत्तम उपाय आहे. जर आपण केसांसाठी रंगाचा वापर करत असाल तर नेहमी चांगल्या ब्रँडचा रंग वापरण्याचे लक्षात ठेवा आणि जर आपण घरी रंग लावून केस रंगवत असाल तर ते लावताना व्यवस्थित काळजी घ्या. जर तुम्ही मेंदी वापरत असाल तर ती १००% नैसर्गिक असल्याची खात्री करून मगच त्याचा वापर करा.