Lokmat Sakhi >Beauty > केसातल्या कोंड्याचा वैताग आलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळून लावा १ गोष्ट, कोंडा गायब

केसातल्या कोंड्याचा वैताग आलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळून लावा १ गोष्ट, कोंडा गायब

Jawed Habib writes: Steps to control dry dandruff at home कोंड्यामुळे केस तर गळतातच, चेहराही खराब होतो, त्यावर जावेद हबीब सांगतात खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 05:29 PM2023-06-19T17:29:03+5:302023-06-19T17:29:55+5:30

Jawed Habib writes: Steps to control dry dandruff at home कोंड्यामुळे केस तर गळतातच, चेहराही खराब होतो, त्यावर जावेद हबीब सांगतात खास उपाय

Jawed Habib writes: Steps to control dry dandruff at home | केसातल्या कोंड्याचा वैताग आलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळून लावा १ गोष्ट, कोंडा गायब

केसातल्या कोंड्याचा वैताग आलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळून लावा १ गोष्ट, कोंडा गायब

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या निगडीत समस्या वाढतात. केसात कोंडा, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे या समस्यांमुळे अनेक लोकं त्रस्त आहेत. वाढत्या कोंड्यामुळे स्काल्पवर इन्फेक्शनची समस्या वाढू शकते. यासह केसांचा पोत देखील खराब होऊ शकतो. केसांची अनेक समस्या फक्त कोंड्यामुळे तयार होऊ शकते.

केसातील कोंडा कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काही उपाय फेल तर काही उपयुक्त ठरतात. केसातील कोंडा घरगुती उपायांनी कमी करायचं असेल तर,  हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी एक टीप शेअर केली आहे. या टीपच्या मदतीने केसातील कोंडा सहज कमी करता येईल, व पुन्हा ही समस्या निर्माण होणार नाही(Jawed Habib writes: Steps to control dry dandruff at home).

कोंडा कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा करा वापर

केसातील कोंडा कमी करण्यासाठी आपण अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीअलर्जिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे स्काल्प स्वच्छ होते, यासह कोंड्याची समस्या देखील कमी होते.

ऐन तारुण्यात त्वचा म्हातारी दिसते? चेहरा वयस्कर? ४ चुका करता त्याचे परिणाम! काय टाळाल...

अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर कसा करावा

केसांमध्ये कोंडा वारंवार येत असेल तर, अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करून पाहा. यासाठी एक वाटी घ्या त्यात शॅम्पू व समप्रमाणात अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन मिक्स करा. हे मिश्रण टाळूवर व केसांवर लावून केस स्वच्छ धुवा. यामुळे केसातील कोंडा कमी होईल. व केस सिल्की - शाईन करतील.

आठवड्यात किती वेळा केस धुणे योग्य? सतत धूत असाल तर किंवा आठवड्यातून एकदाच नहात असाल तर..

केसांवर अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर कितीवेळा करावा

अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे केसांमधून कोंडा तर नाहीसा होईलच, शिवाय केसही चमकदार दिसतील. या उपायामुळे केसातून कोंडा, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे या समस्या कमी होतील. 

Web Title: Jawed Habib writes: Steps to control dry dandruff at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.