Join us  

केस किती दिवसांनी कापावे? खरेच कापले की केस वाढतात का? जावेद हबीब सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2023 6:57 PM

Jawed Habib writes: Three-step hair fall solution केस किती दिवसांनी कापावे? केस कापल्याने केसांना याचा काय फायदा होतो?

केसांमुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे केसांची योग्य निगा राखणं महत्वाचं आहे. धावपळीमुळे अनेकांना केसांची योग्य काळजी घ्यायला जमत नाही. ज्यामुळे केस गळणे, केसात कोंडा, केस पातळ होणे, केसांना फाटे फुटणे या समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा आपण केसांवर विविध प्रयोग करून पाहतो. ज्यामुळे केसांचे आणखी नुकसान होते. असे म्हणतात केस ट्रिम केल्याने त्यांची योग्य वाढ होते. पण काही लोकं केस लांब दिसावे म्हणून ट्रिम करत नाही. 

हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी इन्स्टाग्रामवर हेअरकट आणि ट्रिमिंगशी संबंधित, एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी केस कधी ट्रिम करावे, केस ट्रिम करण्याचे फायदे काय आहेत? याबाबतीत माहिती दिली आहे(Jawed Habib writes: Three-step hair fall solution).

केस केव्हा कापावे ?

जावेद हबीब यांच्या मते, ''केस गळती किंवा केस तुटत असतील तर, दर १० आठवड्यांनी म्हणजेच, २ ते अडीच महिन्यांनी ट्रिम करणे आवश्यक आहे. कारण केसांच्या लांबीपेक्षा केसांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

'ब्रा'च्या पट्ट्यांचे चट्टे पडले आहेत? ५ सोपे उपाय - डाग होतील गायब - त्वचा दिसेल सुंदर

केस ट्रिम करणे का आवश्यक आहे?

केस ट्रिम करणे आवश्यक आहे. कारण केस ट्रिम केल्याने फाटे फुटलेले केस, गळणारे केस, निघून जातात. व केसांची योग्य वाढ होते. केसांना वेळोवेळी ट्रिम केल्याने केसांना नवीन पद्धतीने वाढण्याची संधी मिळते.

फक्त १ चमचा एरंडेल तेल, आणि पांढरे - गळके केस गायब, पाहा स्मार्ट वापर

केस ट्रिम केल्याने आपल्याला एक नवीन लूक मिळतो. आपण लहान केसांचे विविध हेअर स्टाईल करू शकता. ट्रिम केलेल्या केसांचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात केसांमुळे जास्त त्रास होतो. काहींच्या स्काल्पवर कोंडा, केस चिपचिपित होणे अशा समस्या निर्माण होतात. केस कापल्याने या समस्या कमी होतात. केस हेल्दी व त्यांची योग्य वाढ व्हावी, यासाठी दर २ महिन्यांनंतर केस ट्रिम करत राहा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स