Lokmat Sakhi >Beauty > केस धुण्याआधी १ काम करा; महिन्याभरात केस होतील लांब-दाट, पाहा जावेद हबीबचा खास उपाय

केस धुण्याआधी १ काम करा; महिन्याभरात केस होतील लांब-दाट, पाहा जावेद हबीबचा खास उपाय

Jawed Habib's Hair Care Tips : केस धुताना जास्त गळत असतील तर केसांना हेल्दी ठेवण्यासाठी धुण्याआधी केसांची तेलानं मालिश करा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:32 AM2023-07-19T11:32:02+5:302023-07-19T12:17:55+5:30

Jawed Habib's Hair Care Tips : केस धुताना जास्त गळत असतील तर केसांना हेल्दी ठेवण्यासाठी धुण्याआधी केसांची तेलानं मालिश करा. 

Jawed Habib's Hair Care Tips : Use Mustard Oil Before Washing Hairs For Good Hair Growth | केस धुण्याआधी १ काम करा; महिन्याभरात केस होतील लांब-दाट, पाहा जावेद हबीबचा खास उपाय

केस धुण्याआधी १ काम करा; महिन्याभरात केस होतील लांब-दाट, पाहा जावेद हबीबचा खास उपाय

केसांना  मोहोरीचं तेल लावण्याचे अनेक  फायदे आहे. हे तेल स्काल्पला पोषण देते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते. याव्यतिरिक्त या तेलात मॉलिक्यूल्स असतात जे केसांना हायड्रेट ठेवतात आणि केसांना पुरेपूर पोषण देतात. हेअर स्टायलिस्ट  जावेद हबीब यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Jawed Habib Hair Care Tips)  केसांवर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही राईचं तेल लावू शकता. हा उपाय करण्याची सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे शॅम्पू  करण्याच्या १० मिनिटं आधी केसांना राईचे तेल लावा आणि हलक्या हातानं मसाज करा, नंतर केस स्वच्छ धुवा. (How to use mustuard oil for hair growth jawed habib tips)

४ आठवडे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला केसांमध्ये बदल झालेला दिसून येईल. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी इंस्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत अधिक माहिती दिली आहे. ते केसांविषयीचे गैरसजम दूर करणारे आणि केसांच्या वाढीसाठी घरगुती उपायांचे व्हिडिओज शेअर करत असतात. 

मोहोरीचं तेल लावण्याचे फायदे

१) केसांच्या विकासासाठी राईचं तेल अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. यात जवळपास ६० टक्के फॅटी एसिड्स, ओमेगा-२ आणि ओमेगा ६ असतात.  ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. केस डायड्रेट राहतात आणि तुटणंही कमी होते. राईच्या तेलातील एंटीऑक्सिडेंट्स, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम केसांच्या विकासासाठी आवश्यक असते. 

२) राईचे तेल एक उत्तेजकाच्या स्वरूपात काम करते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केस वेगाने वाढण्यास मदत होते. केस दाट होतात. यातील ग्लूकोसायनोलेट एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणांनी समृद्धा असतात जे  स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी आणि नवे केस उगवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

३) केस गळण्याचं सगळ्यात मोठं कारण केसांमध्ये जमा झालेली घाण असू शकतं. अशा स्थितीत केसांच्या चांगल्या वाढीसाठी केस स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं असतं. 

४) केस धुताना जास्त गळत असतील तर केसांना हेल्दी ठेवण्यासाठी धुण्याआधी केसांची तेलानं मालिश करा. 

५)  केसांना फाटे फुटले असतील  नियमित केसांना ट्रिम करायला हवं.  केसांमध्ये जास्त गुंता होत असतील तर वेळीच  सुट होईल असा हेअर कट करा.

Web Title: Jawed Habib's Hair Care Tips : Use Mustard Oil Before Washing Hairs For Good Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.