अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात म्हणजेच नव्या नवेली नंदा. श्वेता बच्चनची मुलगी असणारी नव्या सोशल मिडियावर खूप जास्त ॲक्टीव्ह असते. तिचे फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. तिची आई आणि आजी म्हणजेच श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत ती एक पॉडकास्ट कार्यक्रम करते (Jaya Bachchan's beauty secret for glowing skin). त्याची सोशल मिडियावर बरीच चर्चाही असते. तिने काही दिवसांपुर्वीच त्या दोघींची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये जया बच्चन या त्यांच्या तरुणपणी केसांसाठी आणि त्वचेसाठी कोणते घरगुती उपाय करायच्या, याची माहिती त्यांनी दिली आहे. (home made scrub for removing tanning and body hair)
जया बच्चन यांचं ब्यूटी सिक्रेट
सध्या वाढत्या वयाच्या खाणाखुणा जया बच्चन यांच्या त्वचेवर, केसांवर दिसत असल्या तरी तरुणपणी त्या कमालीच्या देखण्या होत्या. त्यांचे केस तर त्यांच्या पोटऱ्यांपेक्षाही लांब होते. हे सौंदर्य टिकविण्यासाठी त्या काळी खूप कॉस्मेटिक्सही उपलब्ध नव्हतेच.
संध्याकाळी बागेत खूपच चिलटं, डास होतात? बघा १ सोपा उपाय- किडे होतील गायब
त्यामुळे बहुतांश महिला करायच्या तसेच घरगुती उपाय त्या आणि त्यांच्या बहिणी करायच्या. नव्याच्या कार्यक्रमात त्यांनी याच उपायाविषयी सांगितले असून त्यांच्या आई त्यांना लहानपणी कोणता होममेड बॉडी स्क्रब करून द्यायच्या, याची माहिती त्यांनी दिली आहे.
नव्याच्या कार्यक्रमात जया यांनी जो उपाय सांगितला आहे तो उपाय आपल्या घरीही आपण आपल्या आई, आजी, मावशी, आत्या यांना करताना पाहिलेला आहे आणि कधी तरी त्यांचं पाहून आपणही तो अजूनही करतो.
डार्क सर्कल्समुळे चेहरा खूप विचित्र दिसतो? १ सोपा उपाय करा- आठवडाभरातच दिसेल फरक
शरीरावरचं टॅनिंग काढण्यासाठी किंवा शरीरावरचे अतिरिक्त केस काढण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. यासाठी एका वाटीत साय घ्या. त्यामध्ये हळद आणि बेसन पीठ टाका. हे मिश्रण एकत्र करा आणि तो लेप लावून त्याने अंग घासा. त्वचा चमकदार होईल. काही ठिकाणी सायीऐवजी कच्चं दूध किंवा दही घेतलं जातं. काही जण बेसन पीठाऐवजी मैदा किंवा कणिक वापरतात. हा एक अगदी साधा सोपा उपाय असून तो नॅचरल बॉडी स्क्रब म्हणून ओळखला जातो.