Join us  

तरुणपणी घोट्यापर्यंत लांब होते जया बच्चनचे केस, लांबसडक केसांसाठी करायच्या 'हा' घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2024 9:19 AM

Jaya Bachchan's Secret Hair Oil For Long Hair: तरुणपणी जया बच्चन यांचे केस जवळपास त्यांच्या घोट्यापर्यंत लांबसडक होते. यासाठी त्या काय उपाय करायच्या याविषयी त्यांनीच सांगितलेली ही खास माहिती...

ठळक मुद्देत्यांनी सांगितलेला उपाय अतिशय सोपा असून आपल्यालाही घरच्याघरी तो करता येणं सहज शक्य आहे.

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असतात. कधी कौटूंबिक गोष्टी तर कधी सोशल मिडियावरच्या त्यांच्या काही कमेंट्स. त्यामुळे हल्ली तर कायमच चर्चेत असणारं हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या तरुणपणीही असंच होतं. त्यावेळी त्यांच्या अभिनयाची, त्यांच्या चित्रपटांची जशी चर्चा होती, तशीच चर्चा होती ती त्यांच्या लांबसडक, घनदाट केसांची. जवळपास पायाच्या घोट्यापर्यंत त्यांचे केस लांबसडक होते (Jaya Bachchan's Secret Hair Oil For Long Hair). आताही त्यांचे केस वयोमानानुसार पांढरे झाले असले तरी खूप दाट आहेत. त्यांच्या याच दाट, लांबसडक केसांचं सिक्रेट त्यांनी नुकतंच शेअर केलं आहे. (Jaya Bachchan's home remedies for long and strong hair)

 

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता बच्चन हिची मुलगी नव्यानवेली नंदा ही पॉडकास्ट करते आणि त्यामध्ये ती तिच्या आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांची मुलाखत घेत असते.

Summer Special: स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचे १० एकदम लेटेस्ट पॅटर्न्स, ब्लाऊज शिवण्यापूर्वी 'हे' डिझाईन्स पाहाच...

या मुलाखतीदरम्यान नव्याने आजीला तिच्या लांबसडक केसांविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी जया यांनी त्या त्यांच्या लांबसडक, घनदाट केसांसाठी कोणता घरगुती उपाय करायच्या, याविषयीची माहिती दिली होती. त्यांनी सांगितलेला तो उपाय अतिशय सोपा असून आपल्यालाही घरच्याघरी तो करता येणं सहज शक्य आहे.

 

जया बच्चन यांच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

हल्ली केस गळण्याच्या, केसांना वाढ नसण्याच्या समस्या खूपच वाढलेल्या आहेत. अशावेळी केसांवर कोणताही केमिकल्स असणारा उपाय करण्यापेक्षा जया यांनी सांगितलेला घरगुती उपाय करणं कधीही उत्तम.

ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

हा उपाय करण्यासाठी एका कढईमध्ये खोबरेल तेल गरम करायला ठेवा. साधारण २ वाट्या खोबरेल तेल असेल तर त्यात कडिपत्त्याची १५ ते २० पाने टाका तसेच २ टेबलस्पून मेथ्या टाका. हे तेल चांगलं गरम होऊन उकळू द्या. यानंतर थंड झाल्यावर तेल गाळून घ्या. या तेलाने केसांना मसाज करा आणि काही वेळाने केस धुवून टाका. केसांची चांगली वाढ होईल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीजया बच्चन