प्रत्येकालाच आपण सुंदर दिसण्याची इच्छा असते. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये चेहऱ्याच्या आणि केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी बरेच लोक महागड्या उत्पादनांचा देखील वापर करतात, परंतु या उत्पादनामुळे विशेष फायदा होत नाही किंवा फायदा झालाच तर तो तात्पुरता फायदा होतो. बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी६, मॅग्नेशियम, फोलेट, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. आरोग्यासोबतच बीटरूट आपल्या त्वचा आणि केसांसाठी खूप चांगले मानले जाते.
सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar) सांगतेय, त्वचा आणि केसांसाठी बीटरुट कसे उपयुक्त आहेत. जुहीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, जुहीने बीटापासून घरगुती लीपबाम आणि गालांचा ग्लोइंगपणा वाढविण्यासाठी तसेच केसांना मजबुती आणण्यासाठी बीटाचा वापर कसा करू शकतो, हे सांगितले आहे(Beetroot Benefits For Skin & Hair).
साहित्य :-
१. बीट - १ (किसून घेतलेले)
२. एलोव्हेरा जेल - २ टेबलस्पून
३. व्हिटॅमिन 'इ' कॅप्सूल - १ कॅप्सूल
juhiparmar या इंस्टाग्राम पेजवरून जुहीने बीटरूटचा वापर त्वचा आणि स्किनसाठी कसा करू शकतो याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पद्धत :-
१. होममेड लीपबाम आणि चीक टींट (Homemade Lip Balm & Cheek Tint) -
१. होममेड लीपबाम आणि चीक टींट बनवण्यासाठी कच्च्या लाल बीटाचे मोठे तुकडे कापून घ्या.
२. आता हे मोठे तुकडे किसणीवर किसून त्या बीटाचा पातळसर किस काढून घ्यावा.
३. हा किस एका गाळणीत घेऊन चमच्याच्या मदतीने दाबून त्यातील रस काढून घ्या.
४. त्यानंतर या बीटाच्या रसात दोन टेबलस्पून एलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन 'इ' कॅप्सूलची एक कॅप्सूल फोडून घालावी.
५. आता हे तयार झालेले मिश्रण एकजीव करून एका डबीत भरुन स्टोअर करून ठेवावे.
आता आपल्या गरजेनुसार होममेड बीटाचा लीपबाम आणि चीक टींट वापरायला तयार आहे.
२. केसांच्या मजबुतीसाठी नैसर्गिक हेअर टॉनिक (Homemade Hair Tonic) -
१. एक गडद लाल रंगाचे बीट घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
२. धुवून घेतल्यानंतर ते पाण्यात उकळवून घ्यावे.
३. हे पाणी थोडे थंड झाल्यावर एका स्प्रे नोझल असणाऱ्या बाटलीत भरून घ्यावे.
४. केसांची मजबुती वाढविण्यासाठी तुम्ही या बिटाला उकळवून घेतलेल्या पाण्याचा वापर नक्कीच करू शकता.
आपल्या गरजेनुसार केसांच्या मजबुतीसाठी नैसर्गिक हेअर टॉनिक वापरायला तयार आहे.
त्वचा आणि केसांसाठी बीटरूट वापरण्याचे फायदे :-
१. केसांची गळती किंवा केस पांढरे होणे यासारख्या समस्या बीटरूटच्या नियमित सेवनने बऱ्या केल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, बीटचा रस केसांना डाय करण्यासाठी म्हणून वापरला जाऊ शकतो. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
२. केस वाढवायचे असतील तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे बीटरूटचा रस पिणे. यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढेल आणि केसही चमकदार होतील.
३. गुलाबी त्वचा मिळविण्यासाठी त्वचेवर बीटरूटचा रस लावा आणि काही दिवसातच त्याचा परिणाम दिसून येईल. बीटचा रस पौष्टिक असण्याबरोबरच त्वचेवर नैसर्गिक ब्लशसारखे कार्य करते.
४. बीटरूटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक त्वचेसाठी असंख्य फायदेशीर ठरतात. जसे की लवचिकता, हायड्रेशन आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म वाढवणे.