स्कीनकेअर रुटीनमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्यात महिलावर्ग क्लिंजर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि सीरमचा देखील वापर करतात. अनेक लोकं त्वचेसाठी व्हिटामिन सी सीरमचा वापर करतात. जे आपल्या त्वचेची टॅनिंगपासून संरक्षण करते. यासह त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवण्याचे काम करते.
कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्टच्या मते, व्हिटॅमिन सी सीरम त्वचेला काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि बारीक रेषांपासून बचाव करते. महागड्या सीरमचा वापर करण्यापेक्षा आपण घरच्या घरी व्हिटामिन सी सीरम तयार करू शकता. सीरम तयार करतानाचा व्हिडिओ टीव्ही अभिनेत्री जुही परमार हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिटामिन सीचा हा सीरम आपण घराच्या साहित्यात कमी वेळात बनवू शकता(Juhi Parmar shows how to prepare vitamin C serum at home).
व्हिटामिन सी सीरम बनवण्यासाठी लागणारं साहित्य
संत्र्याची सालं
गुलाब जल
एलोवेरा जल
अती पिकलेली केळी फेकून न देता ४ प्रकारे वापरा, चेहरा दिसेल तुकतुकीत-चमकदार
ग्लिसरीन
व्हिटामिन - ई कॅप्सूल
अशा प्रकारे बनवा व्हिटामिन सी सीरम
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात संत्र्याची सालं, गुलाब जल, घालून मिश्रण वाटून घ्या. आता चहाची चाळणी घेऊन यातून रस एका वाटीमध्ये काढून घ्या. आता त्यात एलोवेरा जेल, ग्लिसरीन, व्हिटामिन - ई कॅप्सूल घालून मिश्रण चांगलं मिक्स करा व एका डबीमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा.
आता हातावर थोडं सीरम घेऊन चेहरा व मानेवर लावून मसाज करा. यामुळे त्वचेच्या निगडीत अनेक समस्या कमी होतील. आपण याचा वापर आठवड्यातून १ वेळा करू शकता.
नैसर्गिक व्हिटामिन सी सीरम लावण्याचे फायदे
व्हिटामिन सी सीरम बनवण्यासाठी लागणारं साहित्यात गुलाब जलचा वापर करण्यात आला आहे. याच्या वापरामुळे त्वचेची पीएच लेवल सुधारते. यासह त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. कोरफडीचा वापर अनेक लोक मॉइश्चरायझर म्हणून करतात. कोरफडीमुळे त्वचेचे डाग दूर होतात.
परफ्यूम भसाभसा अंगावर फवारताय? शरीरावर ७ ठिकाणी हलकासा लावा- राहाल दिवसभर फ्रेश-दुर्गंधी गायब
संत्री खाल्ल्यानंतर अनेक लोक साले फेकून देतात. पण ही साले त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे डाग दूर होतात.