Join us  

स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरा, १५ दिवसात केस गळण्याचं प्रमाण होईल कमी; सुधारेल केसांचा पोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2022 1:11 PM

How to stop hair fall: केसांचं गळणं खूपच वाढलं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा. १५ दिवसांत केसगळती कमी होईल, असं हा उपाय सुचविणाऱ्यांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्देप्रत्येकाच्या केसांचं टेक्स्चर वेगवेगळं असतं. त्यामुळे त्यानुसार या उपायाचा परिणाम दिसून येण्यासाठी प्रत्येकाला कमी- जास्त वेळ लागू शकतो. 

हल्ली केस खूप गळतात (hair fall) अशी तक्रार अनेक जणांची असते. यामागची काही मुख्य कारणं म्हणजे एकतर केसांची व्यवस्थित काळजी घेणं, आपल्याकडून होत नाही आणि दुसरं म्हणजे केसांसाठी पोषक असणारे पदार्थ खाण्यात आपण कमी पडतो. त्यात आणखी एक कारण म्हणजे आजकाल हेअर स्ट्रेटनिंग, कलरिंग, कर्ल्स अशा गोष्टींद्वारे केसांवर अनेकदा वेगवेगळी केमिकल्स लावली जातात. तेही अनेक जणींच्या केसांना सहन हाेत नाही आणि मग त्यामुळेही केस गळायला (Home remedies for hair fall) सुरूवात होते.

 

केस गळणं थांबविण्यासाठीचा एक सोपा उपाय इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये स्वयंपाक घरातले ३ पदार्थ वापरून एक उपाय सांगितला आहे. उपाय करायला अगदी सोपा आहे.

दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

हा व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास अगदी १५ दिवसांतच केस गळणं कमी झालं आहे, असं जाणवू लागेल. शिवाय महिन्याभरातच केसांची वाढ होऊ लागेल. प्रत्येकाच्या केसांचं टेक्स्चर वेगवेगळं असतं. त्यामुळे त्यानुसार या उपायाचा परिणाम दिसून येण्यासाठी प्रत्येकाला कमी- जास्त वेळ लागू शकतो. 

 

केसगळती थांबविण्यासाठी उपाय१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून आलं, १ टीस्पून मोहरी, ४ ते ५ लवंगा आणि तुमच्या आवडीचं कोणतंही तेल लागणार आहे.

सतत डोकेदुखीचा त्रास? सतत डोक्याला पट्टी बांधून पेनकिलर खाता, करून बघा ५ उपाय

२. आता आलं किसून घ्या. ते एका सुती कपड्यात टाका. याच कपड्यात लवंगा आणि मोहरीदेखील टाका. त्याची एक छोटी पुरचुंडी बांधा.

३. आता एका काचेच्या जारमध्ये तुमच्या आवडीचं कोणतंही हेअरऑईल घ्या. त्यात ही पुरचुंडी टाका आणि ती पुरचुंडी बुडेल एवढं तेल त्या जारमध्ये टाका. ही काचेची बरणी दिवस सुर्यप्रकाशात ठेवा. आणि त्यानंतर त्याच्यातलं तेल वापरा. या तेलाने आठवड्यातून एकदा केसांना मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाका. 

४. तेल संपलं की पुन्हा नव्याने सगळं साहित्य घ्या आणि अशाच पद्धतीने तेल तयार करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी