Join us  

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ५ मिनिटांचा एक सोपा उपाय, नेहमीच दिसाल तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 12:11 PM

Facial Exercise For Glowing Skin: कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसत असेल, तर स्वत:साठी फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तर जातीलच पण चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो देखील येईल. 

ठळक मुद्देएक पैसाही खर्च न करता घरबसल्या करता येण्यासारखा हा एक सोपा उपाय आहे. हा नैसर्गिक उपाय अधिक उपयुक्त आणि कायम टिकणारा ठरू शकतो.

आजकाल बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम जसा आरोग्यावर होतो आहे, तसाच तो आपल्या त्वचेवर, केसांवरही दिसून येत आहे. त्यामुळेच तर कमी वयातच केस पांढरे होणे, केस गळती, त्वचेवर पिंपल्स येणे किंवा चेहरा अकाली सुरकुतलेला दिसणे अशा तक्रारी बहुतांशा लोकांना जाणवू लागल्या आहेत. अवघ्या पंचविशीतच अनेक जणींच्या डोळ्याभोवती किंवा ओठांच्या आजूबाजुला असणाऱ्या भागात अगदी बारीक सुरकुत्या दिसू लागतात. त्याला आपण फाईन लाईन्स (exercise to reduce fine lines or wrinkles) म्हणतो. हा त्रास वाढू नये किंवा चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ नये म्हणून हा एक सोपा उपाय करून बघा...(Just 5 minutes exercise for glowing skin)

 

एक पैसाही खर्च न करता घरबसल्या करता येण्यासारखा हा एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला स्वत:साठी फक्त ५ मिनिटांचा वेळ काढावा लागेल. पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेऊन चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लपविण्यापेक्षा किंवा काही दिवसांसाठी चेहऱ्यावरचा ग्लो वाढविण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय अधिक उपयुक्त आणि कायम टिकणारा ठरू शकतो. हा उपाय इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ओठांची आणि गालांची बलून पोझ करून चेहऱ्याचे व्यायाम कसे करायचे, याविषयी माहिती देण्यात आली आहे.

 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व्यायामव्यायाम १ यामध्ये सगळ्यात आधी दिर्घ श्वास घेऊन गाल फुगवून घ्या. त्यानंतर गालांची तशीच अवस्था कायम ठेवून मान शक्य होईल तेवढी वर आणि खाली करा. ८ ते १० वेळा हा व्यायाम करा. मध्ये श्वास सोडून पुन्हा दिर्घ श्वास घेऊन व्यायाम करू शकता. या व्यायामामुळे मानेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होते. 

गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

व्यायाम २या दुसऱ्या प्रकारातही गाल फुगवून घ्या. यानंतर मान उजवीकडे आणि डावीकडे वळवा. यात फक्त मान जेव्हा उजवीकडे वळालेली असेल तेव्हा डावा गाल फुगलेला असावा आणि मान जेव्हा डावीकडे वळालेली असेल तेव्हा उजवा गाल फुगलेला असावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीव्यायाम