Lokmat Sakhi >Beauty > फॉलो करा फक्त ३ स्टेप्स, ओठ कायम राहतील मऊ मुलायम आणि सुंदर

फॉलो करा फक्त ३ स्टेप्स, ओठ कायम राहतील मऊ मुलायम आणि सुंदर

Beauty Remedy Lips Care या हिवाळ्यात मुलायम आणि गुलाबी ओठांसाठी काही घरगुती सोप्या टिप्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 04:54 PM2022-10-23T16:54:41+5:302022-10-23T17:16:26+5:30

Beauty Remedy Lips Care या हिवाळ्यात मुलायम आणि गुलाबी ओठांसाठी काही घरगुती सोप्या टिप्स 

Just follow 3 steps, lips will stay soft and beautiful forever | फॉलो करा फक्त ३ स्टेप्स, ओठ कायम राहतील मऊ मुलायम आणि सुंदर

फॉलो करा फक्त ३ स्टेप्स, ओठ कायम राहतील मऊ मुलायम आणि सुंदर

ir="ltr">बहुतांश महिला आपल्या केसांपर्यंत ते नखाच्या टोकापर्यंत पुरेपूर काळजी घेत असतात. उत्तम आणि निरोगी त्वचा यासह केस, नखे, व इतर गोष्टींची देखील आपण काळजी घेतो. मात्र, आपण आपल्या ओठांकडे बहुतेकवेळा दुर्लक्ष करतो. कालांतराने ओठांवरील त्वचा हि निस्तेज आणि काळपट पडू लागते. हिवाळ्यात अनेकवेळा ओठ फुटतात आणि कोरडे पडतात. आपल्या ओठांची त्वचा हि आपल्या शरीरातील त्वचेपेक्षा नाजूक आणि मऊ असते. त्यामुळे ओठांची काळजी घेणं महत्वाचे आहे. ओठांवर बरीच मृत त्वचा तयार होते. ही मृत त्वचा वेळोवेळी काढली नाही तर ओठ काळे आणि निर्जीव होऊ लागतात. जर आपल्याला गुलाबी आणि मुलायम ओठ पुन्हा हवे असतील. तर, खालील दिलेल्या ३ घरगुती स्टेप्सना फॉलो करा. आणि आपल्या ओठांना एक नवीन जीवन द्या.

ओठांवरील डेड स्कीन काढण्यासाठी सोपा उपाय

ओठांवरील काळपटपणा काढण्यासाठी मऊ टूथब्रशचा वापर करा. आपल्या ओठांवर हा टूथब्रश हलक्या हाताने स्क्रब करण्यासाठी वापरा. शक्य असल्यास, नवीन ब्रश किंवा बेबी ब्रश वापरा. प्रथम ब्रश हलका ओला करा अन्यथा ओठ कापले जाऊ शकतात. असे केल्याने ओठांवरची सर्व डेड स्किन सैल होईल आणि ती काढणे सोपे होईल.

एक्सफोलिएट 

डेड स्किन सैल केल्यानंतर, ती ओठांवरून काढून टाकणे खूप महत्वाचे आहे, डेड स्किन काढल्यानंतरच त्या ठिकाणी नवीन त्वचा तयार होते. एक्सफोलिएशनसाठी सर्वप्रथम  2 चमचे साखरमध्ये अर्धा चमचे मध मिसळा. आता लिंबाच्या तुकड्याच्या मदतीने ते ओठांवर घासून घ्या. 2-5 मिनिटे असे केल्यावर कोमट पाण्याने ओठ धुवा. साखरेचे कण ओठांची मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतील, मध ओठांना मऊ करेल आणि लिंबूमध्ये असलेले ब्लीचिंग एजंट ओठांचा काळसरपणा कमी करेल. आणि एक नवीन चमक ओठांवर येईल.

मॉइश्चरायझ 

ओठांना मॉइश्चरायझ करणे शरीराच्या इतर भागाइतकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे एक्सफोलिएट केल्यानंतर ओठांना मॉइश्चरायझ करा. त्यासाठी शिया बटर आणि व्हिटॅमिन ई असलेले लिप बाम वापरा. फक्त एक्सफोलिएट केल्यानंतरच नाही तर दिवसभर तुमच्या ओठांना वेळोवेळी मॉइश्चरायझ करत राहा. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावल्याने ते अधिक मुलायम होतील.

Web Title: Just follow 3 steps, lips will stay soft and beautiful forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beauty Tipslipsब्यूटी टिप्सओठांची काळजी