Join us  

फक्त १ मिनिटात करा १ जादुई उपाय- त्वचेला होतील ५ जबरदस्त फायदे, ते ही चकटफू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 2:51 PM

Just 1 Solution For 5 Skin Problems: हा एक सोपा उपाय करून पाहा, पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याची गरजच नाही...

ठळक मुद्देसकाळी झोपेतून उठल्यावर अंथरुणात बसूनच हा उपाय केला तरी चालेल.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारातून योग्य पोषणमुल्ये न मिळणे, प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे त्वचेचा पोत दिवसेंदिवस खराब होत जातो. त्यामुळे मग कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा डल- निस्तेज दिसणे, ॲक्ने- पिंपल्स अशा अनेक समस्या डोकं वर काढू लागतात. या समस्या कमी करण्यासाठी मग आपण पार्लरमध्ये जाऊन महागडी फेशियल करून येतो. पण त्याचा परिणाम फक्त काही दिवसच दिसतो. त्यानंतर पुन्हा त्वचा पहिल्यासारखी होऊन जाते. त्यामुळेच आता हा एक नॅचरल उपाय करून पाहा (Just one minute solution for glowing skin). फक्त १ मिनिटाचा हा फेस योगा असून त्यामुळे तुमच्या त्वचेला जवळपास ५  प्रकारचे फायदे होतील. (Face yoga for reducing acne and pigmentation)

 

त्वचा चमकदार होण्यासाठी फेस योगा

हा उपाय इंस्टाग्रामच्या smriti.yoga या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळी झोपेतून उठल्यावर अंथरुणात बसूनच हा उपाय केला तरी चालेल.

बटाट्याचे चिप्स, फ्रेंचफ्राईज खायला तुम्हालाही खूप आवडतं? डॉक्टर काय सांगतात, खाण्यापूर्वी एकदा वाचाच..

यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. दीर्घ श्वास घ्या आणि गाल फुगवा. त्यानंतर एका हाताची दोन बोटे ओठांवर ठेवा आणि दुसऱ्या हाताने गालावर पॅटिंग करा (patting technique). म्हणजेच हलक्या हाताने गालावर मारा.

परीक्षेच्या आधी मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ, एकाग्रता वाढेल आणि पाठ केलेलं आठवेल भरभर

असंच दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर करा. एकेका गालावर ३०- ३० सेकंद पॅटिंग केले तरी ते पुरेसे आहे.

यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

 

गालावर पॅटिंग केल्यामुळे होणारे फायदे

१. त्वचेतील बंद pores ओपन होतात. त्यामुळे पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.

२. पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेचा पोत एकसारखा दिसू लागतो.

हे बघा साउथ इंडियन महिलांच्या घनदाट केसांचं सिक्रेट, नेहमीच्या तेलात फक्त ५ पदार्थ घाला- केस होतील सुंदर लांब

३. डार्क स्पॉट्स कमी होतात.

४. त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

५. ॲक्ने, वांग यासारखे त्रास कमी होतात.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीयोगासने प्रकार व फायदे