Lokmat Sakhi >Beauty > कोरिअन मुलींप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? तज्ज्ञ सांगतात तांदुळाच्या पाण्याचा करा 'असा' वापर; दिसेल फरक

कोरिअन मुलींप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? तज्ज्ञ सांगतात तांदुळाच्या पाण्याचा करा 'असा' वापर; दिसेल फरक

K-beauty trend: How to make rice water at home? : तांदुळाच्या पाण्याने चेहऱ्याचे अनेक डाग होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2024 10:21 PM2024-08-25T22:21:05+5:302024-08-25T22:21:54+5:30

K-beauty trend: How to make rice water at home? : तांदुळाच्या पाण्याने चेहऱ्याचे अनेक डाग होतील दूर

K-beauty trend: How to make rice water at home? | कोरिअन मुलींप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? तज्ज्ञ सांगतात तांदुळाच्या पाण्याचा करा 'असा' वापर; दिसेल फरक

कोरिअन मुलींप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? तज्ज्ञ सांगतात तांदुळाच्या पाण्याचा करा 'असा' वापर; दिसेल फरक

भारतीय घरांमध्ये तांदूळ हमखास असतो (Beauty Tips). भात दररोज खाल्ला जातो. तांदुळाचे अनेक फायदे आहेत. तांदुळाच्या पाण्यात अनेक गुणधर्म असतात (Skin Care Tips). त्यातील पौष्टीक घटक केसांसाठी तर फायदेशीर ठरते (Rice Water), पण यामुळे स्किनलाही फायदा होतो. कोरियन मुलींप्रमाणे तुकतुकीत त्वचा मिळवण्यासाठी काही महिला, तांदूळ पावडर किंवा तांदुळाच्या पाण्याचा वापर करतात.

तांदूळ पाण्यात इनोसिटॉल आणि फेरुलिक अ‍ॅसिड आढळते, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. इनोसिटॉल किंवा व्हिटॅमिन बी ८ ही एक प्रकारची नैसर्गिक साखर आहे. जे त्वचेला सुंदर बनवते. त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचा नेमका वापर कसा करावा? याची माहिती ब्यूटी एक्स्पर्ट एलेन चौधरी यांनी व्हिडिओ शेअर करीत दिली आहे(K-beauty trend: How to make rice water at home?).

त्वचेसाठी तांदुळाचे पाणी कसे तयार करावे?

स्किनसाठी तांदुळाचे पाणी तयार करण्यासाठी एक कप तांदूळ घ्या. प्रथम चांगले धुवून घ्या. नंतर त्यात ३ कप पाणी घाला. २ तास तसेच राहू द्या. २ तासानंतर पाणी गाळून घ्या. तयार पाणी २ दिवस तसेच ठेवा. २ दिवसांनी तयार तांदुळाचे पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये भरा. अशा प्रकारे घरगुती तांदुळाच्या पाण्याचे स्किन टोनर रेडी.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

एलन हे तांदळाचे पाणी रात्री चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला देतात. चेहऱ्यावर तांदुळाचे पाणी ३ - ४ वेळा स्प्रे करा. फवारणी केल्यानंतर, चेहरा धुवू नका, तसेच ठेवा. सकाळी चेहरा धुवा. यामुळे तांदुळाच्या पाण्यातील पोषण चेहऱ्याला मिळतील.

तांदुळाच्या पाण्याचे फायदे

- तांदळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा उजळते.

- तांदळाच्या पाण्याने त्वचेची छिद्रे लहान होतात. यामुळे स्किन कायम यंग दिसते.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

- तांदळाचे पाणी त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते आणि त्वचा चमकते.

- चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने, चेहऱ्यावर दिसणारे काळे डाग हलके होऊ लागतात.  

Web Title: K-beauty trend: How to make rice water at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.