त्वचा निरोगी सुंदर ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर आपण करतोच (Skin care Tips). घरगुती स्वयंपाकघरात आढळणारे पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. हळद, बेसनाप्रमाणे तांदुळही त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही (Rice Water). यातील गुणधर्म त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत करतात. यातील दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट एजंट त्वचेला क्लिन करते. यासह तांदळातील फायटिक ऍसिड मुरुम आणि मुरुमांचे डाग काढण्यास मदत करते.
जर आपल्याला नैसर्गिकरित्या त्वचेला क्लिन करायचं असेल तर, तांदुळाचा वापर करा. पण तांदुळाचा वापर त्वचेसाठी नेमका कसा करावा? यामुळे त्वचेला कोणते फायदे मिळतात? दिवाळीत सुंदर आणि हटके दिसायचं असेल तर, तांदुळाचा 'या' पद्धतीने वापर करून पाहा. नक्कीच त्वचेला फायदा होईल(K-beauty trend: How to make rice water at home?).
तांदळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे चेहऱ्यासाठी फायदेशीर असतात. आपण आजपासूनच चेहऱ्यावर तांदुळाच्या पाण्याचा वापर करून पाहू शकता.
मलायका अरोरा रोज पिते ‘या’ फळाचे ज्यूस, पन्नाशीत तिच्यासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर तर हा घ्या उपाय
'या' पद्धतीने करा तांदुळाच्या पाण्याचा वापर
- सर्वात आधी एका वाटीमध्ये तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात २-३ कप पाणी घाला. ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर चहाच्या गाळणीने गाळून तांदुळाचं पाणी वेगळं करा.
दिवाळीत खोपा घाला किंवा फ्रेंच रोल, हेअरस्टाइल पारंपरिक असो मॉर्डन, तुमच्याकडे हवेच हे ५ Hair Brooch
- दररोज या पाण्याचा वापर अंघोळीपूर्वी चेहऱ्यावर करा. स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा. आणि स्प्रे चेहऱ्यावर शिंपडा. किंवा तांदुळाच्या पाण्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या.