प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) हा लोकांमध्ये कायम चर्चेचा विषय चालू असतो. बॉलिवूडमधील अभिनेता - अभिनेत्री यांच्यासाठी प्लास्टिक सर्जरी म्हणजे एकदम सामान्य गोष्ट आहे. बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी केली की ती अभिनेत्री आणि तिची प्लास्टिक सर्जरी यांवर चर्चा रंगवल्या जातात. एवढेच नव्हे तर ही प्लास्टिक सर्जरी यशस्वी झाली तर ठिक पण तेच बिघडली तर सगळ्यांसमोर कायमच हसं होऊन बसत. बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींच्या प्लास्टिक सर्जरी या यशस्वी झाल्या आहेत तर काहींच्या फसल्या आहेत. या फसलेल्या प्लास्टिक सर्जरी पाहून असे वाटते की, आधीचा चेहरा बरा होता, आणि पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही.
सौंदर्यविश्वात व बॉलिवूडमध्ये एक विषय बराच काळ लोकप्रिय आहे तो म्हणजे प्लास्टिक सर्जरी. अनेक वर्षांपासून या प्लास्टिक सर्जरीचा वापर करण्याचे लोकांमध्ये प्रमाण वाढले आहे. प्लास्टिक सर्जरी आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये ही प्रक्रिया स्वीकारणे खूप सामान्य आहे. अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे विषय असो किंवा तिच्या भूमिका, काजोलने नेहमीच मोकळेपणे त्यावर वक्तव्य केले आहे. बॉलिवूड हे एक झगमगते क्षेत्र आहे, आणि याच क्षेत्राचा भाग असलेल्या प्लास्टिक सर्जरीबद्दल काजोलने तरुण अभिनेत्रींना एक मोलाचा संदेश दिला आहे. तसेच हा संदेश देत असताना तिच्या हटके मताने तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे(Kajol advises young actresses to never opt for plastic surgery under pressure: ‘It should be a personal choice’).
प्लास्टिक सर्जरीबद्दल काजोल म्हणते...
प्लास्टिक सर्जरीबद्दल बोलताना काजोल सांगते, इतरांच्या मते किंवा विचारानुसार स्वतःचे मोजमाप करणे योग्य नाही. सत्य हे आहे की कोणी कितीही सुंदर असले तरी लोक त्यांच्यात दोष शोधतात. दुसऱ्या - तिसऱ्या व्यक्तीच्या मतांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःला स्वीकारा, नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात. काजोल सध्या एका हिंदी बॉलिवूड चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत काजोल प्लास्टिक सर्जरीबद्दल व्यक्त झाली. ती म्हणाली, “देवाने तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे बनवलं आहे आणि तुम्हाला हव्या असलेल्या ज्या गोष्टी देवाने दिल्या नसतील त्यासाठी मेकअप आहे.” इतरांनी सांगितलं म्हणून सर्जरी करू नका, असा सल्ला तिने दिला आहे. “प्लास्टिक सर्जरी करावी की नाही ही वैयक्तिक निवड असावी. कारण २५ लोक तुम्हाला कर असं सांगत आहेत म्हणून तुम्ही तो निर्णय घेऊ नये”, त्याचबरोबर फक्त इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी सर्जरीचा पर्याय निवडू नका.असंही ती म्हणाली.
भूमी पेडणेकरने एका इव्हेण्टसाठी का घातला असेल ३४ वर्षे जुना ड्रेस? कोणती स्पेशल स्टाइल...
प्रियांका चोप्राच्या लिटिल देसी गर्लच्या ओव्हरकोटची चर्चा, हा ओव्हरकोट इतका महाग का ?
भारतात प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांचा आकडा...
भारतात गेल्या काही वर्षांत प्लास्टिक सर्जरी करणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संडे गार्डियनच्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लॅस्टिक सर्जन्सच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कॉस्मेटिक सर्जरीच्या बाबतीत भारत पहिल्या १० देशांपैकी एक आहे.