Join us  

कलौंजीचा वापर फक्त स्वयंपाकात करताय? बनवा फेसपॅक, मिळेल कोमल आणि तजेलदार लूक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 8:31 PM

Kalonji Facemask या हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका हवी असल्यास, कलौंजी फेसपॅकचा करा असा वापर.. त्वचेला देईल नवी चमक

कलौंजीचा वापर आपण शतकानुशतके स्वयंपाक घरात करत आलो आहे. कलौंजी उर्फ ​​मंगरेला ही एक छोटी गोष्ट आपल्या शरीराला अनेक उत्तम गुणधर्म देतात. आपण दररोज त्याचे सेवन केले पाहिजे. काळ्या रंगाची कलौंजी मसाल्यांमध्येच वापरली जाते, परंतु आपण याचा वापर स्कीनसाठी देखील करू शकता. याने आपण फेसपॅक बनवू शकता. फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते. चला तर मग फेसपॅक बनवण्याची कृती आणि फायदे जाणून घेऊयात.

कोरड्या त्वचेसाठी ब्राइटनिंग फेस मास्क

कलौंजीपासून तयार फेसपॅक त्वचा कोमल आणि चमकदार बनवते. हा मास्क बनवण्यासाठी बाजारातील वस्तूंची गरज नाही. तर आपण घरात असलेल्या वस्तूंपासून देखील बनवू शकता. कलौंजीपासून तयार हा फेसमास्क चेहरा कोमल बनवते, यासह डाग कमी करण्याचे काम करते.

कलौंजी फेसपॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

कलौंजी पावडर - १ चमचा

ओट्स पावडर - १ चमचा

मध - एक छोटा चमचा

बदाम तेल

दुधाची मलई

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कलौंजी पावडर, ओट्स पावडर, मध, बदाम तेल, आणि दुधाची मलई टाका. आणि सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा. 

मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हे मिश्रण त्वचेवर १५ मिनिटे ठेवा. आणि थंड पाण्याने धुवून टाका. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. उत्तम रिझल्टसाठी हा पॅक आठवड्यातून एकदा लावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी