Lokmat Sakhi >Beauty > 'या' काळ्या बिया भाजून करा 'असा' वापर; पांढऱ्या केसांना डाय - मेहेंदी लावायची गरजच नाही..

'या' काळ्या बिया भाजून करा 'असा' वापर; पांढऱ्या केसांना डाय - मेहेंदी लावायची गरजच नाही..

Kalonji seeds benefits for grey hair and how to use them : पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 02:37 PM2024-11-17T14:37:06+5:302024-11-17T14:37:55+5:30

Kalonji seeds benefits for grey hair and how to use them : पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागलं?

Kalonji seeds benefits for grey hair and how to use them | 'या' काळ्या बिया भाजून करा 'असा' वापर; पांढऱ्या केसांना डाय - मेहेंदी लावायची गरजच नाही..

'या' काळ्या बिया भाजून करा 'असा' वापर; पांढऱ्या केसांना डाय - मेहेंदी लावायची गरजच नाही..

स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ आरोग्यासाठी वरदान ठरतात (Hair Care Tips). ज्याचा फायदा संपूर्ण आरोग्याला होतो. केस, त्वचा, हृदय, हाडं आणि वजन कमी करण्यासही मदत होते (Grey Hairs). आजकाल केसांची निगा राखणं अनेकांना अवघड होत आहे. कारण बिघडलेली जीवनशैली, वाढलेलं वजन किंवा इतर कारणांमुळे केस (Kalonji Seeds) निर्जीव आणि खराब होतात. शरीराला पौष्टीक घटक मिळाले नाही तर, साहजिकच केस गळतात, पांढरे होतात. कमी वयात केस पांढरे झाले की, आपण वयापेक्षा मोठे दिसू लागतो. ज्यावर उपाय म्हणून आपण केसांना मेहेंदी, डाय किंवा इतर उपाय करून पाहतो.

जर केसांची निगा राखायची असेल आणि पांढऱ्या केसांना रासायनिक गोष्टी लावायच्या नसतील तर कलौंजीचा उपाय करून पाहा. या काळ्या बिया देखील केस काळे करण्यास मदत करतील. कलौंजीचे अनेक फायदे आहेत. यात लिनोलेईड गुण आढळते. जे केसांमधील ब्लॅक पिगमेंट सेल्स कमी करून केस काळे करण्यास मदत करतात. परंतु, केसांसाठी नेमकं कलौंजीचा वापर कसा करावा? यामुळे पांढरे झालेले केस काळे होऊ शकतात का?(Kalonji seeds benefits for grey hair and how to use them).

पांढऱ्या केसांवर कलौंजीचा करा 'असा' वापर

लागणारं साहित्य

कलौंजीच्या बिया

आवळा मीठ लावून खा, तब्येतीसाठी वरदान ठरणारे केवळ १० रुपयांचा उपाय - तारुण्य टिकेल कायम

खोबरेल तेल

लिंबाचा रस

केसांवर कलौंजीचा वापर कसा करावा?

- सर्वात आधी पॅन गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. नंतर त्यात ३ - ४ चमचे कलौंजीच्या बिया घालून भाजून घ्या. भाजताना बिया जळणार नाहीत, याची काळजी घ्या.

- भाजलेल्या कलौंजीच्या बिया एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात खोबरेल तेल घालून मिक्स करा. आपण भाजलेल्या कलौंजीच्या बियांची पावडरही तयार करू शकता.

शिट्टी वाजली की वरण फसफसून बाहेर येतं? शेगडी - भिंत खराब? रणवीर ब्रार सांगतात १ ट्रिक; स्वयंपाक होईल झटपट

- जर आपल्या स्काल्पवर कोंडा असेल तर, त्यात लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसामुळे कोंडा दूर होईल, आणि स्काल्प क्लिन राहील.

- नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. तयार कलौंजीचं तेल स्काल्पपासून ते केसांच्या टोकापर्यंत लावा. हळूहळू बोटाने स्काल्पवर मसाज करा. मसाजमुळे रक्ताभिसरण वाढेल आणि तेल टाळूमध्ये सहज शोषले जाईल. त्यानंतर हे तेल संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा.

- तेल लावल्यानंतर केस कापडाने किंवा शॉवर कॅपने झाका. कमीतकमी ३० मिनिटे ते १ तास केसांमध्ये राहू द्या. शेवटी केस सौम्य शाम्पूने धुवून घ्या. अशा पद्धतीने केसांचा कोंडा दूर होईल. 

Web Title: Kalonji seeds benefits for grey hair and how to use them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.