Lokmat Sakhi >Beauty > मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

Kalonji seeds Benefits for grey Hairs (kes kale Kase Karave) : कलौंजीच्या बिया अनेक वर्षांपासून चपाती,  भाजी, डाळ तडका यांसारख्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरल्या जात आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:05 AM2023-11-17T11:05:00+5:302023-11-17T11:29:12+5:30

Kalonji seeds Benefits for grey Hairs (kes kale Kase Karave) : कलौंजीच्या बिया अनेक वर्षांपासून चपाती,  भाजी, डाळ तडका यांसारख्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरल्या जात आहेत. 

Kalonji seeds Benefits for grey Hairs Know How to Use Them 5 Minutes Hair Dye | मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

केस गळणं (Hair Fall) आणि वयाआधीच केस पांढरे (Grey Hair Solution) होणं या दोन्ही गोष्टींमुळे फक्त शरीरावर नाही तर मनावरही परिणाम होतो. आजकाल बरेचसे लोक या समस्येचा सामना करत आहेत. (kes kale karnyache gharguti upay) काही घरगुती उपाय केस कायमचे काळे होण्यासाठी मदत करू  शकतात. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी अनेक  घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. यासाठी एक सोपा उपाय फायदेशीर ठरेल. विशेष म्हणजे घरगुती उपायांचे कोणतेही साईट इफेक्ट्स दिसून येत नाहीत अनावश्यक खर्चही वाचतो. (How to turn grey hair into black permanently)

कलौंजीच्या बिया अनेक वर्षांपासून चपाती,  भाजी, डाळ तडका यांसारख्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरल्या जात आहेत.  कलौंजीमध्ये एंटी हिस्टामाईन आणि एंटी फंगल गुणधर्म असतात. या बियांच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय कलौंजी हाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी  कलौंजी बरीच फायदेशीर ठरते. (How to Use Kalonji Seeds For Hair Growth)

केसांसाठी कलौंजी कशी वापरावी? (Kalonji For Hair Benefits and How to use it)

कलौंजी फ्री रेडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. कोरडे, कुरळे आणि ड्राय केसांसाठी कलौंजीच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. कलौंजीचे तेल केसांमधील मॉईश्चर  मेंटेन ठेवण्यास मदत करते. कलौंजी मास्कचा वापर तुम्ही केसांतील कोंडा कमी करण्यासाठी करू शकता. यात एंटी फंगल गुणधर्म असतात. कलौंजीने केसांची मसाज केल्यानं खाज येणं, इरिटेशन या वेदनांपासून आराम मिळते. केसांची काळजी घेण्यासाठी केसांमध्ये काळ्या बियांचा वापर करायला हवा. जेणेकरून  केसांचे गळणं रोखण्यास मदत होते. 

१ चमचा हळदीने काळेभोर होतील पिकलेले केस; हळदीचा ३ प्रकारे वापर करा-मिळवा सुंदर केस

वाढत्या वयात आपल्या केसांच्या फॉलिकल्समध्ये मेलेनिन नावाचे कलर सेल्स कमी होऊ लागतात. ज्यामुळे केस पांढरे व्हायला सुरूवात होते. अभ्यासानुसार कलौंजीचे तेल मेलेनिनला  पोहोचणारं नुकसान रोखते आणि केस दीर्घकाळ काळे ठेवण्यास मदत करते.  कौंजीच्या बिया केसांना लावल्याने केस गळणं रोखण्यास आणि वय वाढीची प्रक्रिया मंद होण्यास मदत होते. केसांना पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा वापर करू शकता. 

केसांना काळे करण्यासाठी कलौंजीचा वापर कसा करावा?

रोज  केसांवर कलौंजीच्या तेलाचा वापर करणं परिणामकारक ठरू शकतं. कलौंजीच्या बिया नारळाच्या तेलाबरोबर गरम करा.  थंड झाल्यानंतर गाळून या तेलाने केसांची स्काल्पची मसाज करा. शॅम्पूने केस धुण्याआधी कमीत कमी एक तास आधी किंवा रात्रभर केसांना तेल लावून ठेवा. पांढऱ्या केसांवर उपाय करण्यासाठी कलौंजीच्या बीया आणि मेहेंदीचे मिश्रण हा उत्तम उपाय आहे. 

Web Title: Kalonji seeds Benefits for grey Hairs Know How to Use Them 5 Minutes Hair Dye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.