Join us  

कंगना रणोट सांगते; गुड लूक्स,चेहरा, केस यांच्यापलिकडे सुंदर 'दिसण्याची' गोष्ट. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 6:35 PM

स्वत:चा स्वीकार ही गोष्ट किती ताकद देते, याचा अनुभव लिहिणारी कंगणा रणोटची पोस्ट बरंच काही सांगतेय..

ठळक मुद्देसौंदर्य आणि आत्मविश्वास यांची एक खास गोष्ट

कंगना रणोट. आज तिचा वाढदिवस. एरव्ही तिचे ट्विट्स, तिच्या पोस्ट समाजमाध्यमात वादळ घेऊनच येतात , अशी आताची स्थिती आहे. मात्र तिच्या वाढदिवशी जी पोस्ट तिने लिहिली ती मात्र सौंदर्य आणि आत्मविश्वास यांची एक खास गोष्ट सांगते. दिसणं, गुड लूक्स, चेहरा, केस यांच्यापलिकडे जाऊन सुंदर दिसण्याची गोष्ट. कंगना म्हणते, लोक म्हणतात की बायकांना शेल्फ व्हॅल्यू असतं. म्हणजे काही दिवसच असते त्यांची किंमत. मग पूढे कुणी पाहत नाही, त्यांच्याकडे. सुंदर दिसणाऱ्या स्वीट सिक्सटीन टाइप्स मुलीच प्रगती करतात, बाकीच्या नाहीत. ज्यांना डोकं नाही फक्त रूप आहेत अशा मुलींची चलती असते. मॅच्युअर, शहाण्या बायकांनी घरात रहावं, लग्न करावीत. हे सगळं मी ही अनेकदा ऐकलं, चीड यायची त्याची..

https://www.facebook.com/KanganaRanaut/posts/291839988955204

आज मी ३४ वर्षांची होतेय. मला कुणीच नव्हतं सांगितलं की, वयाच्या ३४ व्या वर्षी मी करिअरच्या शिखरावर असेल. माझी कला, माझा अनुभव, काम यावर माझं यश साजरं होतंय, मी लग्न केलंय की नाही, माझं वय किती याचा काही संबंधच उरलेला नाही. माझा अनुभव, माझं कौशल्य हे माझ्या आजवरच्या प्रवासाचं, यशाचं संचित आहे.हे सगळं मी का जमवू शकले, कारण मी जशी आहे तसं मी मला स्वीकारलं. माझा देह स्वीकारला. मी खूप जाड आहे की खूप बारीक याकडे मी लक्षच नाही देत. मी सेन्शुअल आहे, माझ्या सेक्शुॲलिटीला मी स्वीकारलं आहे. आता चेहऱ्यावर पिंपल्स आलेत की पिरीअड्स सुरु आहेत यानं मला फरक पडत नाही. आणि  मला स्वत:विषयी वाईट वाटावं, स्वत:चा त्रास व्हावा असा त्रास देण्याची ताकद आता कुणात नाही.वय वाढणं, केसात पांढरी चांदी चमकू लागणं, थोड्या किरकोळ सुरकुत्या येणं हे किती सुंदर असू शकतं, हे मला दिसतं आहे. सुखाचं आहे ते. त्यातून माझं व्यक्तीमत्व घडेल, मला ताकद मिळेल. त्यातून माझं सौंदर्यच वाढेल. त्यामुळे मला सगळ्या मुलींना सांगायचं आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी, वयाच्या या खिडकीतून जग फार्फार सुंदर दिसतं आहे.

टॅग्स :कंगना राणौतब्यूटी टिप्स