मोठी बहिण करिश्मा कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जाताना करिनाने हा टीशर्ट घातला होता. नेहमीच्या टीशर्टपेक्षा हा शर्ट अगदीच वेगळा वाटला. पिवळा आणि ऑरेंज या दोन रंगांचा वापर करून टाय- डाय पॅटर्नमध्ये हा टीशर्ट बनविण्यात आला आहे. कुल लूक देणारा आणि अतिशय आरामदायी असा हा टीशर्ट घरच्या घरी तयार करणेही सोपे आहे बरं का....
सध्या टाय- डाय म्हणजे बांधणीच्या पॅटर्नची खूप क्रेझ आहे. कुर्ता किंवा टीशर्ट यांच्यावर घरच्याघरी बांधणी करता येते. असा एखादा टीशर्ट आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवाच. कारण यामुळे आपले कलेक्शन खरोखरच परिपूर्ण दिसू शकते. करिश्मा कपूरचा टीशर्ट ऑरेंज आणि पिवळा या दोन रंगात डाय केलेला होता.
टीशर्टच्या शोल्डर खांद्यावरून उतरलेले नसावेत, तो अतिढगळ नसावा, अशा काही संकल्पना डोक्यात असतील, तर त्या काढून टाका. कारण करिना कपूरने घातलेला टीशर्ट अतिशय लूज होतो आणि त्याच्या शोल्डर्स खाली उतरलेल्या होत्या. टीशर्टच्या बाह्या हाताच्य कोपरापर्यंत उतरलेल्या होत्या आणि खूपच लूज दिसत होत्या. असे असले तरीही करिना त्या टीशर्टमध्ये अतिशय ट्रेण्डी आणि कूल दिसत होती. त्यामुळे तुम्हीही असा एखादा सैलसर बांधणी केलेला टीशर्ट तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवायला हरकत नाही. आउटिंग, हॉटेलिंग, मुव्ही किंवा शॉपिंग यासाठी जर बाहेर जाणार असाल, तर नक्कीच अशा प्रकारचा टीशर्ट हिट ठरेल.