आपली स्किन सुंदर, नितळ, तजेलदार दिसावी यासाठी आपण त्वचेची काळजी घेतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या त्वचेनुसार रोजचे एक स्किनकेअर रुटीन फॉलो करतो. या स्किन केअर रुटीनमध्ये आपण वेगवेगळ्या क्रिम्स, लोशन, टोनर, सिरमचा वापर करुन त्वचेची काळजी घेत असतो. ज्याप्रमाणे सुंदर आणि हेल्दी त्वचेसाठी बाहेरुन स्किनकेअर करणे गरजेचे असते त्याचप्रमाणे आतूनही स्किनची काळजी घेतली पाहिजे. स्किन बाहेरुन चांगली दिसण्यासाठी आपण स्किनकेअर करतोच पण आतून चांगली दिसावी यासाठी आपल्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपण काय आणि कसे खातो याचा देखील आपल्या स्किनवर खोलवर परिणाम होत असतो.
सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडिओत त्यांनी आपली स्किन चांगली राहण्यासाठी आपल्या डाएटमध्ये कोणत्या तीन मुख्य पदार्थांचा समावेश करावा याबद्दलचे एक सिक्रेट सांगितले आहे. स्किनकेअर (Tips for good skin) तर आपण करतोच, यासोबतच ते करताना अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण यासोबतच जर आपण आपल्या डाएटकडे विशेष लक्ष देत काही आवश्यक पदार्थांचा समावेश डाएटमध्ये केला तर स्किन नैसर्गिकरित्या आणखीनच सुंदर दिसण्यास मदत होईल(Kareena Kapoor's nutritionist Rujuta Diwekar reveals her top 3 tips for perfect glowing skin this festive season).
स्किनकेअर रुटीन सोबत या गोष्टी करा...
१. ऋजुता दिवेकर आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी फॉलो करायला सांगतात. यात घरचे जेवण, वेळेवर झोपणे आणि दररोज एक्सरसाइज या तीन मुख्य गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. स्किनची काळजी घेण्यासाठी हा सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय असल्याचे म्हटले आहे. यासोबतच आपल्या रोजच्या आहारात असायलाच हवेत असे तीन पदार्थ कोणते ते पाहूयात.
१. केशर :- चांगल्या स्किनसाठी डाएटमध्ये केशरचा समावेश करावा. केशर आपण रात्रभर पाणी किंवा दुधात भिजवून मग ते खाऊ शकता. असे भिजवून घेतलेले केशर वापरुन आपण रात्री झोपण्यापूर्वी मसाला दूध पिऊ शकता. रात्रभर पाण्यांत भिजवलेले केशर मासिक पाळी येण्याच्या दहा दिवस आधी रोज खाल्ल्याने आपली स्किन नॅचरली ग्लो करु लागेल.
फक्त १ चमचा तूप आणि ४ थेंब ऑलिव्ह ऑइल-केसांचं गळणं कायमचं बंद करणारा भन्नाट उपाय...
२. केळं :- स्किन हेल्दी राहण्यासाठी केळं खाणं फायदेशीर ठरेल. रोज सकाळचा नाश्ता करण्यासाठी जर आपल्याकडे पुरेसा वेळ नसेल किंवा घाई गडबडीत नाश्ता तयार केला नसेल तर अशावेळी आपण केळं खाऊ शकता. केळं खाल्ल्याने आपलं पोट शांत होण्यास मदत मिळते. जर आपल्या पोटाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ, अँक्ने कधीच येणार नाहीत. यासाठी चांगल्या स्किनसाठी स्किनकेअरसोबतच रोज एक केळं खावं.
आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...
३. काजू :- स्किनचे आरोग्य व सौंदर्य दोन्ही चांगले टिकवून ठेवण्यासाठी काजू खाणे आवश्यक आहे. हेल्दी स्किनसाठी रोजच्या डाएटमध्ये काजूचा समावेश नक्की करावा. जर आपल्याला भरपूर प्रमाणांत स्ट्रेस असेल तर या वाढत्या स्ट्रेसचा परिणाम चेहऱ्यावर देखील दिसून येतो. सततच्या स्ट्रेसमुळे चेहेऱ्यावर पिंपल्स, पुरळ येण्याची समस्या अधिकच वाढू लागते. अशावेळी स्ट्रेस कमी करण्यासाठी काजू खावेत. काजू खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो. परिमाणी, आपल्या त्वचेचे पोर्स आकुंचन पावतात. पोर्स आकुंचन पावल्याने आपोआप पिंपल्स, पुरळ, अँक्ने यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. संध्याकाळच्या टी - टाइमच्या वेळी किंवा मधल्या वेळेत छोटीशी भूक लागल्यास आपण काजू खाऊ शकता.
पांढरे केस आनंदाने मिरवणाऱ्या ६ बॉलिवूड अभिनेत्री, ना खोटे रंग-ना वय लपवण्याची धडपड!