Lokmat Sakhi >Beauty > करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

Karishma Tanna Glowing Skin Secret Banana Peel Benefits : Karishma Tanna's skincare hack is rubbing banana peel on her face, here are its benefits : करिश्मा तन्ना सांगतेय केळी खा आणि केळीची सालं सौंदर्य खुलविण्यासाठी वापरा, पाहा तिचा खास घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2025 19:55 IST2025-01-25T19:21:33+5:302025-01-25T19:55:39+5:30

Karishma Tanna Glowing Skin Secret Banana Peel Benefits : Karishma Tanna's skincare hack is rubbing banana peel on her face, here are its benefits : करिश्मा तन्ना सांगतेय केळी खा आणि केळीची सालं सौंदर्य खुलविण्यासाठी वापरा, पाहा तिचा खास घरगुती उपाय...

Karishma Tanna Glowing Skin Secret Banana Peel Benefits Karishma Tanna's skincare hack is rubbing banana peel on her face, here are its benefits | करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

बाजारांतून फळ विकत आणताना आपण त्यात केळी देखील आवर्जून विकत आणतोच. केळ्यामध्ये एवढी पोषक तत्व असतात की दररोज एक केळ नियमितपणे खाल्लं तर नक्कीच आरोग्य चांगलं (Karishma Tanna Glowing Skin Secret Banana Peel Benefits) राहतं आणि प्रतिकारशक्ती वाढत जाते. पचनाच्या अनेक समस्या दुर करण्याचे अनेक चांगले गुणधर्म केळ्यामध्ये असतात. केळ जेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे, तेवढीच त्याची सालं देखील चांगली असते. चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स दूर करून त्वचा चमकविण्याचं सिक्रेट केळीच्या सालींमधे दडलेलं आहे(Karishma Tanna's skincare hack is rubbing banana peel on her face, here are its benefits).

केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, राइबोफ्लेविन यासोबतच व्हिटॅमिन बी ६ यांसारखी अनेक जीवनसत्त्वे असतात. हेच सगळे गुणधर्म केळीच्या सालींमध्येही असतात. त्यामुळे केळं जितक पौष्टिक आहे तितकच त्याच्या सालीमध्ये देखील पोषक तत्व आढळतात. केळं खाऊन आपण केळीची साल फेकून देतो परंतु हीच साल आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी कामी येते. सुप्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजनची अभिनेत्री करिश्मा तन्ना नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम अकाउंटवरून छोट्या छोट्या ब्यूटी टिप्स शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी केळीच्या सालांचा (Banana Peel For Skin) वापर कसा करता येईल हे याचे गुपित शेअर केले आहे. 

 करिश्मा तन्ना सांगते तिच्या आईचे एक स्पेशल ब्यूटी सिक्रेट... 

अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती त्वचेसाठी केळीच्या सालीचे फायदे सांगत आहे. करिश्मा म्हणते की, बरेच लोक मला विचारतात की माझ्या चमकदार आणि हायड्रेटिंग त्वचेचे सिक्रेट काय आहे. तेव्हा ती त्वचेसाठी केळीच्या सालींचा वापर करण्याचा सल्ला देते. याचबरोबर करिश्मा म्हणते की हे ब्यूटी सिक्रेट माझ्या आईच आहे. आई स्वतःच्या स्किनकेअर रुटीनमध्ये अनेकदा केळ्याच्या सालींचा वापर करत असे. त्यानंतर तिने मला देखील केळीच्या सालींचा त्वचेसाठी वापर करण्यास शिकवले. करिश्मा तन्ना आईचे ब्यूटी सिक्रेट फॉलो करत आहे. 

चमचाभर गव्हाचे पीठ, पायांच्या भेगा - काळपटपणा छूमंतर! घ्या उपाय, वाटेल आधीच का नाही केला...

त्वचेसाठी केळीच्या सालींचा वापर नेमका कसा करावा ? 

केळ्याची साल सोलून ती साल आतील बाजूने चेहऱ्यावर हलक्या हातानी चोळून मसाज करु शकतो. यासाठी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ही केळ्याची साल चेहऱ्यावर लावून मसाज करावा व १५ मिनिटे चेहरा सुकू द्यावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. जेव्हा तुम्ही ही साल चोळून तुमचा चेहरा स्वच्छ कराल तेव्हा तुमची त्वचा खूप मऊ आणि गुळगुळीत होईल.

लग्न ठरलंय? प्या दीपिका पादुकोण लग्नापूर्वी पीत होती ते खास ज्यूस, चेहऱ्यावर येईल ग्लो...


घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत...

त्वचेसाठी केळ्याच्या सालींचे अनेक फायदे... 

१. केळीची साल त्वचेवर चोळल्याने त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.

२. केळीची साल चेहऱ्यावर चोळल्याने मुरुम आणि मुरुमांचे काळे डाग कमी होतात.

३. डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी तुम्ही केळीच्या साली हलक्या हाताने डोळ्यांखालील त्वचेवर चोळू शकता.

४. हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली तरी केळीची साल चोळू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा निघून जाईल.

Web Title: Karishma Tanna Glowing Skin Secret Banana Peel Benefits Karishma Tanna's skincare hack is rubbing banana peel on her face, here are its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.