डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. सध्याचे बदलते फास्ट लाईफस्टाईल हे आव्हानात्मक आहेच. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर बसून १० ते १२ तास काम करतो. या लाईफस्टाइलमुळे आपल्याला सुख - सुविधा तर प्राप्त होतात परंतु, त्यासोबतच अनेक शारीरिक समस्यांना सामोरे देखील जावे लागते. सतत डेस्कवर काम करणाऱ्या बऱ्याचजणांना डोळ्यांच्या चारही बाजूला (Be Dark Circle Free With These Turmeric Under Eye Masks) डार्क सर्कल्स येण्याची समस्या सतावत असते. तरुणींपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांचं ही डार्क सर्कल्सची समस्या त्रास देते.(Kasturi Haldi For Dark Circles).
डोळ्यांखालील डार्क सर्कल्समुळे अनेकदा स्त्रियांना याचा त्रास होतो. डार्क सर्कल्स केवळ डोळ्यांचेच सौंदर्यच बिघडवत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याचा लूकही खराब करतात. या डार्क सर्कल्समुळे आपला चेहरा निस्तेज दिसून लागतो. डोळ्यांखालील त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे, अशा प्रकारच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. सध्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्याचे प्रमाण वाढले आहे. मग, हे डार्क सर्कल्स हटवण्यासाठी काहीजणी महागड्या क्रिम्सची मदत घेतात. पण याच्या वापराने तात्पुरता फरक पडतो. डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.डार्क सर्कलच्या समस्येला तोंड देण्यासाठी तुम्ही एक झटपट सोपा उपाय देखील करून पाहू शकता(remove dark circles with Turmeric).
साहित्य :-
१. कस्तुरी हळद - २ (काड्या हळदीच्या) २. मध - १ टेबलस्पून ३. बदाम - २ (रात्रभर भिजवून घेतलेले)
कृती :-
१. कस्तुरी हळद घेऊन ती पाण्यासोबत उगळून घ्यावी. २. रात्रभर पाण्यांत भिजत ठेवलेले बदल देखील उगळून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ३. आता एका बाऊलमध्ये उगळून घेतलेली कस्तुरी हळद व बदामाची पेस्ट एकत्रित करुन त्यात मध घालावे.
म्हणायला कडू पण मेथ्या म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ४ सोप्या पद्धतीने वापरा- केसांसाठी तर अतीगुणकार...
लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय..
या आयपॅकचा वापर कसा करावा ?
१. हा आयपॅक बनवून झाल्यावर डोळ्यांखालील डार्कसर्कल्सवर लावून घ्यावा. २. त्यानंतर किमान २० ते ३० मिनिटे हा आयपॅक डोळ्यांखाली तसाच राहू द्यावा. ३. त्यानंतर गार पाण्याने डोळे स्वच्छ धुवून घ्यावेत. ४. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास डोळ्यांखालील डार्क सर्कल्स आपोआप कमी होऊ लागतील.