Lokmat Sakhi >Beauty > कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...

कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...

Katrina Kaif reveals mother-in-law's secret onion and amla hair oil recipe. Here's how you can make it for silky hair : Katrina's Mother-in-law Secret Hair Oil Recipe : Katrina Kaif swears by her mother-in-law’s hair oil blend : कतरिनाच्या 'लंबे बालों का राज' आहे तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं हे पारंपरिक पद्धतीचं तेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2025 09:42 IST2025-03-22T09:17:34+5:302025-03-22T09:42:00+5:30

Katrina Kaif reveals mother-in-law's secret onion and amla hair oil recipe. Here's how you can make it for silky hair : Katrina's Mother-in-law Secret Hair Oil Recipe : Katrina Kaif swears by her mother-in-law’s hair oil blend : कतरिनाच्या 'लंबे बालों का राज' आहे तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं हे पारंपरिक पद्धतीचं तेल...

Katrina Kaif reveals mother-in-law's secret onion and amla hair oil recipe. Here's how you can make it for silky hair Katrina's Mother-in-law Secret Hair Oil Recipe | कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...

कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...

कतरिना (Katrina Kaif) नेहमीच आपल्या फिटनेस सोबतच आपल्या सौंदर्याची देखील तितकीच काळजी घेते. तिचे स्किन आणि हेअर केअर रुटीन ती अगदी न चुकता फॉलो करते. त्वचा आणि केसांची काळजी (Katrina Kaif reveals mother-in-law's secret onion and amla hair oil recipe) घेण्यासाठी ती शक्यतो घरगुती किंवा नैसर्गिक पद्धतीने (Katrina's Mother-in-law Secret Hair Oil Recipe) तयार केलेल्या गोष्टींचाच समावेश करते. कतरिनाने एका मुलाखती दरम्यान तिच्या सुंदर आणि मजबूत केसांचे एक खास सिक्रेट शेअर केले आहे. तिच्या केसांच्या सुंदरतेमागे चक्क तिच्या सासूबाईंचा हात असल्याचे तिने सांगितले आहे( Katrina Kaif swears by her mother-in-law’s hair oil blend).

कतरिना आपल्या केसांना तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल लावत असल्याचे ती सांगितले आहे. हे खास तेल तिच्या सासूबाई घरच्याघरीच तयार करतात. या तेलामध्ये कांदा, आवळा, ॲव्होकाडो आणि अनेक नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. कतरिना याच घरगुती तेलाने केसांची मालिश करते, यामुळेच तिच्या केसांचे आरोग्य आणि सौंदर्य अजूनही कायम टिकून आहे. कतरिनाच्या सासूबाई घरच्याघरीच तयार करत असलेल्या या सिक्रेट तेलाची रेसिपी नेमकी काय आहे पाहूयात. 

साहित्य :- 

१. कांदा - १ मध्यम आकाराचा कांदा 
२. आवळा पावडर किंवा रस - १ कप 
३. ॲव्होकाडो - १ मध्यम आकाराचे (मॅश करून घेतलेले)
४. खोबरेल तेल - २ कप 
५. इसेन्शियल ऑईल - ४ ते ५ थेंब 

आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर - फरक दिसेल काही दिवसांत...

कृती :- 

१. सर्वात आधी कांदा बारीक चिरून घ्यावा त्यानंतर ॲव्होकाडो मॅश करून घ्यावे. 
२. आता एका मोठ्या पॅनमध्ये खोबरेल तेल घेऊन ते हलकेच गरम करून घ्यावे.

फक्त वाटीभर बेसन पिठात मिसळा 'हे' ६ पदार्थ, विकतचे फेसमास्क जाल विसरुन - त्वचा दिसेल सुंदर....

आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर - फरक दिसेल काही दिवसांत...

३. पॅनमधील खोबरेल तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, आवळा पावडर किंवा आवळ्याचा रस या दोघांपैकी एक घालावे. 
४. सर्वात शेवटी यात मॅश केलेल ॲव्होकाडो आणि इसेन्शियल ऑईलचे ४ ते ५ थेंब घालावेत. 
५. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून २ ते ३ मिनिटे हे तेल गरम करून घ्यावे. 
६. सगळ्यांत शेवटी हे तेल गाळून एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

हे तेल केसांना लावण्याचे फायदे :- 

१. कांदा :- कांद्यामुळे केसांच्या मुळांना मजबुती मिळाल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते. 

२. आवळ्याची पावडर :- आवळा पावडर किंवा आवळ्याच्या रसामुळे केसांची वाढ अधिक वेगाने होण्यास मदत मिळते. 

३. ॲव्होकाडो :- ॲव्होकाडो केसांना चमक आणि पोषण मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरते. केसांना मॉइश्चरायझिंग करून केसांचा रुक्षपणा देखील कमी करण्यास मदत करते. 

४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांना हायड्रेटेड ठेवून हेअर ग्रोथसाठी अधिक फायदेशीर ठरते.  

Web Title: Katrina Kaif reveals mother-in-law's secret onion and amla hair oil recipe. Here's how you can make it for silky hair Katrina's Mother-in-law Secret Hair Oil Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.