बॉलीवूडमधले अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांना अजूनही त्यांच्या सौंदर्यासाठी काही साधे- सोपे घरगुती उपाय करणं आवडतं. अर्थात हे लोक त्यांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच घरगुती उपाय करतात, असं मुळीच नाही. पण कधी कधी नेहमीच्या महागड्या ट्रिटमेंट्सपेक्षा त्यांना घरगुती सौंदर्योपचार करणं आवडतं. म्हणूनच तर प्रियांका चोप्रा, जान्हवी कपूर, जया बच्चन, माधुरी दीक्षित अशा अभिनेत्री केसांसाठी, त्वचेसाठी त्या काय घरगुती उपाय करतात, याविषयी नेहमीच सांगत असतात (Kiara Advani's Beauty Secret). त्यांचे हे उपाय पारंपरिक असून आपणही आपल्या आई, आजी, मावशी, काकू यांच्याकडून ते ऐकलेलेच असतात (home made face pack for natural glowing skin). फक्त आपल्याला त्याचा थोडा विसर पडलेला असतो. आता असाच एका खास उपाय अभिनेत्री कियारा आडवाणीने सांगितला आहे. (beauty tips by Kiara Advani)
चमकदार त्वचेसाठी कियारा आडवाणी लावते 'हा' खास फेसपॅक
त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कियाराला कोणता घरगुती उपाय करायला आवडतो, याविषयी तिनेच सांगितलेली माहिती cookwith_gruhini या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये कियाराने आपल्या स्वयंपाक घरातले फक्त ४ पदार्थ वापरून फेसपॅक कसा तयार करायचा, याविषयी माहिती दिली आहे.
लालबुंद साडीवर गायत्रीमंत्र आणि हातातली पोटलीही खास, पाहा नीता अंबानींचा देखणा थाट
यामध्ये कियारा सांगते की हा उपाय पारंपरिक असून तिला तो तिच्या आजीकडून समजला आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मध, २ चमचे बेसन, १ चमचा दही आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि तो लेप चेहऱ्यावर लावा.
लेप सुकत आला की हलक्या हाताने चोळून तो काढून टाका. यामुळे त्वचेवरची डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा मऊ, कोमल होईल. तसेच टॅनिंग कमी झाल्यामुळे उजळ, चमकदार दिसेल.
रात्री पोटऱ्या एवढ्या दुखतात की त्यामुळे शांत झोपही येत नाही? बघा त्यामागची कारणं आणि ३ उपाय
लिंबाला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे लिंबाच्या रसामुळे त्वचेचं सौंदर्य खुलून येईल. त्यातले ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेसाठी पोषक ठरतील.