Join us

किआरा अडवाणीच्या चमचमत्या ग्लोचं सीक्रेट, १ घरगुती उपाय; करून तर पाहा आणि चेहरा दिसेल तजेलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 19:06 IST

Kiara Advani's secret to achieving a natural and healthy glow : बेसनाच्या फेसमास्कने चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो..

स्किनसाठी (Skin care Tips) आपण बरेच उपाय करतो. ब्यूटी पार्लरमध्ये विविध ब्यूटी ट्रिटमेण्ट (Beauty Treatment) घेण्यापासून ते घरगुती उपाय. विविध गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतो. पण सौंदर्य प्रसाधनांचा (Beauty Product) वापर करून चेहऱ्यावर ग्लो येईलच असे नाही. अनेकदा आपण नैसर्गिक उपायांचा देखील वापर करतो. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो (Natural Glow) येतो. नैसर्गिक उपायांमुळे चेहऱ्यावर चमक येते. पण आपण कधी विचार केला आहे का? अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कशी येते?

ब्यूटी क्वीन किआरा अडवाणी आपल्या निखळ सौंदर्यासाठी ओळखली जाते. किआरासारखं चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, ती फॉलो करत असलेली रुटीन पाहा. तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य देखील जाणून घ्या. यामुळे नक्कीच काही दिवसात फरक दिसेल(Kiara Advani's secret to achieving a natural and healthy glow).

ब्रेकअप झालं तरीही एक्स पार्टनर तुमचा पाठलाग करतो? ' ऑर्बिटिंग' नावाचा नवा त्रास, पाहा त्याचा अर्थ

बेसनाचा मास्क

- चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, बेसनाचा फेसमास्कचा वापर करून पाहा. हा फेसमास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, दूध किंवा दुधाची साय घाला. नंतर त्यात मध घाला. पेस्ट होईपर्यंत छान मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर

- यामुळे चेहऱ्यावरील घाण, धूळ आणि टॅनिंग दूर होईल. यामुळे नक्कीच फायदा होईल. शिवाय स्किन क्लिअर होईल.

भाजी आणि फळांच्या सालींचा वापर

- आपण चेहऱ्यावर भाजी किंवा फळांच्या सालीचा देखील वापर करू शकता. यासाठी आपण सफरचंद किंवा काकडीच्या सालीचाही वापर करू शकता. सफरचंदाची साल वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. तर, काकडीच्या सालीमध्ये भरपूर फायबर, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि के आढळते. तर, केळीच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. ज्यामुळे टॅनिंग दूर होईल.

 

टॅग्स :कियारा अडवाणीब्यूटी टिप्सत्वचेची काळजी