Join us  

..तर करूच नका अंडर आर्म व्हॅक्सिंग ! तज्ज्ञ सांगतात 6 कारणं, त्यावेळी व्हक्सिंग न करणंच बरं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 4:04 PM

अंडर आर्म व्हॅक्सिंग ( अंडर आर्म व्हॅक्सिंग) करणं गरजेचं असलं तरी ते सर्व परिस्थितीत सुरक्षित असतंच असं नाही. तज्ज्ञांच्या मते काही परिस्थितीत अंडर आर्म व्हॅक्सिंग टाळणं जास्त योग्य असतं. ते कधी

ठळक मुद्देकाखेतील केस काढण्यासाठी अंडर आर्म व्हॅक्सिंग हे रेजरच्या तुलनेत जास्त प्रभावी असतं हे मान्य, पण काखेतील त्वचा संवेदनशील असल्यानं अंडर आर्म व्हॅक्सिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते. 

अंडर आर्म व्हॅक्सिंग करणं हे आवश्यक असलं तरी काखेतली त्वचा ही नाजूक आणि संवेदनशील असल्यानं अंडर आर्म व्हॅक्सिंग करताना काळजी घेणं (precaution about underarm waxing) आवश्यक असल्याचं सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ट यांचं म्हणणं आहे. काखेतल्या संवेदनशील त्वचेचा विचार करता सर्व परिस्थितीत अंडर आर्म व्हॅक्सिंग करणं सुरक्षित असतंच असं नाही. रिया वशिष्ट यांच्या मते 6 प्रकारच्या परिस्थितीत अंडर आर्म व्हॅक्सिंग करणं (when avoid underarm waxing) टाळायला हवं.

Image: Google

अंडर आर्म व्हॅक्सिंग कधी टाळावं?

1. अनेकांना वातावरणात खूप उष्णता असल्यास/ दमटपणा असल्यास काखेत खूप घाम येतो. खरंतर अशा परिस्थितीत  अंडर आर्म व्हॅक्सिंग करणं टाळायला हवं. कारण या परिस्थितीत जर अंडर आर्म व्हॅक्सिंग केलं तर खूप खाज येते. केवळ खाजच येते असं नाही तर खाजवल्यामुळे त्वचेतून रक्त येवून आणखी आग होण्याची शक्यता असते. 

2. गरोदर अवस्थेत दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अंडर आर्म व्हॅक्सिंग करणं टाळावं. या अवस्थेत रेजरचा वापर करणं सुरक्षित असतं. कारण गरोदर अवस्थेत शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या कारणामुळे काखेतली त्वचा अतिसंवेदनशील होते. अशा परिस्थितीत जर अंडर आर्म व्हॅक्सिंग केलं तर ते फार वेदनादायी होतं. अंडर आर्म व्हॅक्सिंग करताना नकळतपणे जर व्हॅक्सिंग स्ट्रिप जोरात खेचली गेली तर काखेत सूज येण्याची शक्यताही असते. त्यामुळे गरोदर अवस्थेत अंडर आर्म व्हॅक्सिंग न करण्याचा सल्ला दिला जातो. 

Image: Google

3. काखेत जर फोड असतील, पुळ्या झालेल्या असतील तर अंडर आर्म व्हॅक्सिंग करु नये. पुळ्या आणि फोड असताना व्हॅक्सिंग केल्यास तेथील त्वचा जास्त दुखते, आग करते. तसेच फोडांवरील त्वचा ओढली जावून जखम होण्याची शक्यता असते. काखेत जखम झाल्यास घाम येवून जखमेत संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे काखेत मुरुम पुटकुळ्या असताना अंडर आर्म व्हॅक्सिंग करु नये. 

4. रेजरने अंडर आर्म करण्याची सवय असल्यास त्या ऐवजी लगेच अंडर आर्म व्हॅक्सिंग न करण्याचा सल्ला दिला जातो कारण रेजरनं व्हॅक्सिंग करताना काखेतील केसांची वाढ आणि व्हॅक्सिंग केल्यानंतर होणारी काखेतील केसांची वाढ यात  फरक असतो. रेजरनं काखेतील केज काढल्यानंतर तेथील केस हे बारीक वाढतात. हे बारीक केस व्हॅक्सिंगच्या टप्प्यात काढले जात नाही. त्यामुळे आधी या केसांची थोडी वाढ होवू द्यावी लागते. केस छोटे असल्यास अंडर आर्म व्हॅक्सिंग करुन काहीच फायदा होत नाही. 

Image: Google

5. मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसात त्वचा जास्त संवेदनशील झालेली असते. अशा वेळी जर अंडर आर्म व्हॅक्सिंग केलं तर त्याचा त्रास होतो. तो टाळण्यासाठी मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसात अंडर आर्म व्हॅक्सिंग करु नये. 

6. विशिष्ट प्रकारची औषधं सुरु असल्यास अंडर आर्म व्हॅक्सिंग करणं हे नुकसानकारक मानलं जातं. हार्मोन्स संबंधी औषधं सुरु असल्यास, गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास, प्रतिजैविके  घेत असल्यास किंवा मुरुम पुटकुळ्यांवर तोंडावाटे औषधं सुरु असल्यास अंडर आर्म व्हॅक्सिंग न करण्याचा सल्ला दिला जातो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी