दिवसभर थकून आल्यानंतर विश्रांतीसाठी सर्वप्रथम, आपल्यासमोर बेड दिसतो. जेव्हा आपण आराम करण्यासाठी बेडवर झोपतो, त्याच्या आधी पाय स्वच्छ धुवावेत असे सांगण्यात येते. पण असेही काही लोकं आहेत, जे झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवत नाही. माणसाचा पाय हा एकमेव भाग आहे, जो शरीराचे संपूर्ण भार स्वतःवर घेतो. त्यामुळे पायात जडपणा, पेटके आणि वेदना होतात. त्यावर धूळही चिटकते, ज्यामुळे आपला बेड खराब होऊ शकतो.
मात्र, रात्री झोपण्यापूर्वी पाय का धुवावेत? यामुळे पायाला कोणते फायदे मिळतात? झोपण्यापूर्वी पाय धुण्याची योग्य पद्धत कोणती? यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेसतज्ज्ञ वरुण कात्याल यांनी ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटला माहिती दिली आहे(Know Benefits Of Washing Feet Before Hitting The Bed).
पायांच्या स्नायूंसाठी आरामदायक
दिवसभराच्या धावपळीमुळे पायांचे स्नायू आणि हाडे दुखू लागतात. आपले पाय संपूर्ण शरीराचे भार सहन करते. अशा परिस्थितीत, पाय दुखण्याची समस्या वाढते. रात्री झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने पायांच्या स्नायूंना आराम तर मिळतोच, यासह सांधेदुखीचाही त्रास कमी होतो.
फक्त १ कच्चा बटाटा चेहऱ्याला लावा, काळे डाग, पिगमेंटेशन होईल कमी! बघा योग्य पद्धत
ऊर्जा मिळते
झोपण्यापूर्वी पाय धुवून झोपल्याने मेंदूला शांती मिळते. यासह संपूर्ण शरीराला आरामही मिळतो. दिवसभर आपले पाय जमिनीवर असतात. आपले पाय संपूर्ण शरीराचा भार उचलतो. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे आवश्यक आहे. पाय धुवून झोपल्याने आपल्याला उर्जा जाणवेल, व शांत झोपही लागेल.
शरीराचे तापमान योग्य राहते
ज्या लोकांना इतरांपेक्षा जास्त उष्णता जाणवते, त्यांनी पाय धुवून झोपावे. असे नियमित केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.
पायांची त्वचा कोमल होते
दिवसभर चालणे, धावणे यामुळे पायांवर ताण येतो. झोपण्यापूर्वी पाय धुण्याची सवय केवळ पायांचा ताण कमी करण्यासाठी उपयुक्त नाही. तर, यामुळे पायाची त्वचाही कोमल होते. पाय स्वच्छ धुतल्याने पायातील घाण निघते, यासह स्किन सॉफ्ट होते.
रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..
पायाच्या दुर्गंधीपासून आराम
इतरांच्या तुलनेत जर, आपल्या पायातून जास्त दुर्गंधी येत असेल तर, नियमित पाय धुण्याची सवय लावा. अनेकदा टाईट स्लीपर आणि शूजमुळे पायातून दुर्गंधी येऊ लागते. काहींच्या पायामधून सतत घाम निघतो. झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने एअर फ्लो राहतो. ज्यामुळे दुर्गंधी येत नाही. पाय धुताना आपण पाण्यात लिंबाचा रस मिक्स करू शकता.
झोपण्यापूर्वी पाय कसे धुवावे?
पाय धुण्यासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्या. पाण्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा. त्यात पाय थोडा वेळ भिजवा. ५ ते ८ मिनिटानंतर पाण्यातून पाय बाहेर काढून चांगले पुसून घ्या. त्यानंतर पायांना थोडे तेल किंवा क्रीम लावा. यामुळे पायात आर्द्रता टिकून राहते.