Join us  

सुळसुळीत सिल्की केस, मऊ मुलायम त्वचा हवी? सकाळी झोपेतून उठताच करा ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 1:10 PM

Know How Skin and Hair Need Internal Care 4 Remedies : घरच्या घरी करता येतील असे काही सोपे आणि नैसर्गिक उपाय पाहूया...

आपली त्वचा छान अभिनेत्रींप्रमाणे ग्लोईंग असावी आणि केसही मस्त मुलायम आणि सिल्की असावेत अशी आपली इच्छा असते. या दोन्हीमुळे आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार असते. पण काही ना काही कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येणे, डाग पडणे, त्वचा सुरकुतणे किंवा रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. केसांच्या बाबतीतही तसेच होते, कधी केस खूप कोरडे होतात तर कधी अचानक प्रमाणाबाहेर गळायला लागतात. मग यासाठी आपण बाजारात मिळणारी महागडी उत्पादने आणतो आणि केमिकल्स असलेली ही उत्पादने चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी वापरतो (Know How Skin and Hair Need Internal Care 4 Remedies) . 

याचा तात्पुरता उपयोग होत असला तरी दिर्घकाळ उपयोग होत नाही आणि पुन्हा केस आणि त्वचेच्या नेहमीच्या तक्रारी सुरु होतात. असे होऊ नये म्हणून आज आपण घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय पाहणार आहोत. मॉर्निंग रुटीनमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास आपले केस आणि त्वचा नितळ, मुलायम राहण्यास निश्चितच मदत होईल. प्रसिद्ध योग अभ्यासक स्मृती यासाठीच आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स देते, त्या कोणत्या आणि कशा फॉलो करायच्या पाहूया...

(Image : Google)

१. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि जवस भाजून एका बरणीत बरुन ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण १ चमचा खा. यामुळे त्वचा आणि केसांना चांगले पोषण मिळेल. योग्य पोषण मिळत नसल्याने केस गळत असतील किंवा त्वचा रुक्ष झाली असेल तर या समस्या दूर होण्यास याचा चांगला फायदा होतो. 

२. ओलं खोबरं आरोग्यासाठी चांगलं असतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे केस आणि त्वचा चांगली हवी असेल तर न चुकता ओलं खोबरं खायला हवं. यामुळे तुम्ही अकाली वयस्कर दिसणार नाही. त्वचा ग्लोईंग दिसण्यास मदत होईल आणि केसांना चांगले कंडीशनिंग मिळण्यास मदत होईल. 

३. आवळा ज्यूस हे उत्तम केस आणि त्वचेसाठी आणखी एक महत्त्वाचं सिक्रेट असू शकतं. यामध्ये एकतर व्हिटॅमिन सी असते तसेच आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरात लोह चांगले शोषले जाते, केसगळती कमी होते, पचनक्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे शक्यतो कोल्डप्रेस केलेल्या आवळ्याचा ज्यूस घ्यायला हवा. याबरोबरच कोरफडीच्या ज्यूसही प्यायला हवा. 

४. तसेच काही आसने नियमित करायला हवीत. यामुळे तब्येत तर चांगली राहतेच पण त्वचेला आणि केसांना होणारा रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास आणि केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीलाइफस्टाइलआहार योजना