लिपस्टीक हा आपल्या मेकअपमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. घराबाहेर पडताना अनेक जणींनी बाकी काही मेकअप केला नाही तरी काजळ आणि लिपस्टीक या बेसिक गोष्टी तरी आपण लावतोच. बरेचदा रस्त्यात, ट्रेनमध्ये, ऑफीसला पोहोचल्यावरही घाईघाईत आपण बाहेर जाताना ओठांवर लिपस्टीक फिरवतो आणि बाहेर जातो. त्यामुळे वेगवेगळ्या रंगाच्या, ब्रँडच्या लिपस्टीक खरेदी करणे तरुणींना आणि महिलांना आवडते. यातल्या सगळ्याच लिपस्टीक आपण वापरतो असे नाही, तर आपल्याला आवडणाऱ्या १ किंवा २ शेड आपण नेहमी लावतो (Know How To Choose Perfect Lipstick shade according to Complexion and Occasion).
मात्र लिपस्टीक लावताना दिवसाची वेळ किंवा कार्यक्रमाचे स्वरुप आणि आपल्या त्वचेची शेड यांचा प्रामुख्याने विचार करायला हवा. ही गोष्ट अनेकांना माहित नसल्याने आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या शेडच्या लिपस्टीक असूनही आपण त्या योग्य पद्धतीने कॅरी करु शकत नाही. कलर कॉम्बिनेशनचे विशेष ज्ञान नसल्याने आपण कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर कोणत्याही रंगाची लिपस्टीक लावतो. पण तुम्हाला खरंच सुंदर दिसायचं असेल आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर आपल्या स्कीन टोननुसार आणि कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार कोणती लिपस्टीक लावलेली जास्त चांगली दिसेल हे समजून घ्यायला हवे. स्पेसिफीक रंगांची निवड केल्यास तुमचा लूक तर चांगला दिसेलच पण तुम्ही सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसायला मदत होईल.
रंग गोरा असेल तर...
१. दररोजसाठी - पिंक ब्लश रंग
२. ब्रंच किंवा लंचसाठी जाताना - रुबी टच
३. मिटींगला जाताना - ग्लॉसी नॅचरल
४. मुलीमुलींची नाईट आऊट पार्टी असेल तर - रॉयल पिंक
५. डिनर पार्टीला जाताना - प्युअर रेड
सावळा रंग असल्यास...
१. दररोजसाठी - माव्ह टच
२. ब्रंच किंवा लंचसाठी जाताना - पिंक नेक्टर
३. मिटींगला जाताना - आईसड मोका
४. मुलीमुलींची नाईट आऊट पार्टी असेल तर - पिच स्पार्कल
५. डिनर पार्टीला जाताना - रेड ग्लॅम
गहूवर्ण किंवा त्वचा जास्त गडद असेल तर...
१. दररोजसाठी - बेरी ब्लास्ट
२. ब्रंच किंवा लंचसाठी जाताना - डस्की रोज
३. मिटींगला जाताना - स्पायसी न्यूड
४. मुलीमुलींची नाईट आऊट पार्टी असेल तर - प्लम प्युअर