Lokmat Sakhi >Beauty > गौरींच्या हळदीकुंकवासाठी चमकदार चेहरा हवा, करा १ झटपट उपाय! फेशियल न करताही चेहऱ्यावर येईल ग्लो

गौरींच्या हळदीकुंकवासाठी चमकदार चेहरा हवा, करा १ झटपट उपाय! फेशियल न करताही चेहऱ्यावर येईल ग्लो

Know How To Make Face Cleanser at Home for Natural Glow Ganpati festival : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस आणि मेकअपपेक्षा घरच्या घरी करा नॅचरल उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 11:21 AM2023-09-20T11:21:37+5:302023-09-20T16:19:16+5:30

Know How To Make Face Cleanser at Home for Natural Glow Ganpati festival : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस आणि मेकअपपेक्षा घरच्या घरी करा नॅचरल उपाय

Know How To Make Face Cleanser at Home for Natural Glow Ganpati festival : Cleanser to make your face glow at home; Get natural glow... | गौरींच्या हळदीकुंकवासाठी चमकदार चेहरा हवा, करा १ झटपट उपाय! फेशियल न करताही चेहऱ्यावर येईल ग्लो

गौरींच्या हळदीकुंकवासाठी चमकदार चेहरा हवा, करा १ झटपट उपाय! फेशियल न करताही चेहऱ्यावर येईल ग्लो

गणपती-गौरी म्हणजे आपल्याकडे साजरे होणारे मोठे सण. गणपतीचे आगमन झाले की आपल्याला चाहूल लागते ती गौरींची. वर्षभराने येणाऱ्या या माहेरवाशिणींसाठी काय करु आणि काय नको असे होऊन जाते. गौरी बसवण्यापासून ते त्यांच्या विसर्जनापर्यंत त्यांचे भरपूर लाड केले जातात. त्यांच्यासाठी नवीन वस्त्रे, गोडाधोडाचे जेवण, डेकोरेशन, लायटींग, फराळाचे पदार्थ अशा एक ना अनेक गोष्टी या निमित्ताने केल्या जातात. या गौरीच्या दिवशी आपल्याकडेही दर्शनाला भरपूर पाहुणे येतात. इतकेच नाही तर आपल्यालाही अनेकांकडे हळदी-कुंकवासाठी बोलावणे आलेले असते (Know How To Make Face Cleanser at Home for Natural Glow Ganpati festival). 

अशावेळी आपण छान दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते. मात्र कामांमुळे झालेली दगदग, अपुरी झोप यांमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. अशावेळी चेहऱ्यावर ग्लो हवा म्हणून आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस घेतो किंवा भरपूर मेकअप करतो. पण यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने चेहरा चमकदार दिसला तर जास्त चांगले नाही का? म्हणूनच चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी घरच्या घरी क्लिंजर कसे तयार करायचे पाहूया. हे क्लिंजर फेस वॉश म्हणून वापरल्यास त्याचा अतिशय छान इफेक्ट येतो आणि नैसर्गिक घटक असल्याने कोणताही त्रास होण्याचीही शक्यता नसते...

(Image : Google)
(Image : Google)

१. मसूर डाळीचे १ चमचा थोडे जाडसर पीठ करुन घ्यायचे.

२. यामध्ये १ चमचा तांदळाचे पीठ घालायचे. 

३. त्यात १ चमचा बेसन आणि १ चमचा मुलतानी माती घालायची. 

४. अर्धा चमचा हळद घालून हे कोरडे पीठ चमच्याने चांगले एकत्र करुन घ्यायचे.

५. एका काचेच्या बरणीत भरुन हे पीठ वापरण्यासाठी स्टोअर करायचे. 

६. ज्यावेळी चेहरा क्लीन करायचा असेल तेव्हा १ चमचा पीठ घेऊन त्यात पाणी किंवा कच्चे दूध घालायचे. 

७. मग हे पीठ चेहऱ्यावर सगळीकडे चांगले चोळायचे आणि ५ मिनीटे तसेच ठेवायचे. 

८. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुवायचा, चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास चांगली मदत होते. 

  

Web Title: Know How To Make Face Cleanser at Home for Natural Glow Ganpati festival : Cleanser to make your face glow at home; Get natural glow...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.