Join us  

केस काही केल्या वाढतच नाहीत? घरीच करा एक खास तेल, महिन्याभरात दिसेल फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 5:59 PM

Know How To Make Hair Oli at Home to Reduce hair fall and hair Growth : सगळे घटक नैसर्गिक असल्याने केसांना कोणतीही हानी पोहोचण्याची शक्यता नसते.

आपले केस लांबसडक असावेत, त्याच्या छान छान हेअरस्टाईल करता याव्यात असं आपल्याला साहजिकच वाटत असतं. पण अनेकदा आपले केस वाढतच नाहीत. मग आपण केस वाढण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत राहतो तरी हे केस वाढतच नाहीत. केसांना कधी खूप फाटे फुटतात, कधी केस भयंकर गळतात तर कधी त्यांची वाढच खुंटल्यासारखी होते. अशावेळी आपण खूप निराश होऊन जातो आणि काय करावे आपल्याला काहीच कळत नाही. अशातच आपण दुसऱ्या कोणाचे मोठे केस पाहिले की तर आपल्याला आणखीनच त्रास होतो (Know How To Make Hair Oli at Home to Reduce hair fall and hair Growth). 

मग आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा सारख्या ट्रिटमेंटस घेतो नाहीतर वेगवेगळे मास्क किंवा तेल लावून केस वाढण्यासाठी प्रयत्न करत राहतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. म्हणूनच आज आपण केसांच्या वाढीसाठी घरच्या घरी एक खास तेल कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून हे तेल तयार होते. तसेच यातील सगळे घटक नैसर्गिक असल्याने केसांना कोणतीही हानी पोहोचण्याची शक्यता नसते. पाहूयात यासाठी नेमकं काय करायचे....  

(Image : Google)

१. जास्वंदाच्या झाडाची ४ ते ५ पाने, साधारण अर्धा कांद्याचे काप, कोरफडीच्या पानाचे ७ ते ८ तुकडे, एका कढईत एकत्र करायचे. 

२. यामध्ये ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, ५ ते ७ कडूनिंबाची पाने, चमचाभर मेथ्या घालायच्या.

३. यामध्ये आपल्या आवडीनुसार खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घालायचे आणि बारीक गॅसवर चांगले उकळायचे.  

४. साधारण १० मिनीटे उकळल्यानंतर या मिश्रणाचा रंग बदलून चॉकलेटीसर होतो. 

 

५. मग थंड झाल्यावर हे तेल गाळून एका बाटलीत किंवा बरणीत भरुन ठेवायचे. 

६. १०० टक्के नैसर्गिक असलेले हे तेल केस धुण्यापूर्वी हे तेल केसांच्या मुळांना लावायचे. 

७. एकदा केल्यानंतर हे तेल साधारण महिन्याभरात संपवायला हवे. त्यानंतर नवीन करावे. चांगला इफेक्ट येण्यासाठी आठवड्यातून ३ वेळा तेल केसांना लावावे. त्यानंतर केस नेहमीप्रमाणे शाम्पू आणि कंडीशनर लावून धुवावेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी