Join us  

सणावाराला चेहऱ्यावर ग्लो हवा तर घरीच करा नैसर्गिक क्लिंजर; केमिकल्स वापरण्याची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 3:15 PM

Know How to make Homemade face cleanser : विशेष खर्च न करता घरीच फेस वॉश तयार केल्यास चेहरा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होते.

सणवार म्हटले की नवीन कपडे घालून, आवरुन एकमेकांच्या घरी जाण्याचे दिवस. या दिवसांत आपण आवरुन देवाला जाणे, मित्रमंडळींच्या घरी जाणे, एकत्र जेवणाचे बेत करणे असे काही ना काही प्लॅन्स करत असतो. सणावाराला आपण छान दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी आपण बऱ्याच आधीपासून कपड्यांची खरेदी करणे, दागिने घेणे, पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारच्या ट्रिटमेंटस घेणे आणि सौंदर्यप्रसाधने खरेदी करणे असे काही ना काही करत असतो. चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपला सगळा प्रयत्न चाललेला असतो (Know How to make Homemade face cleanser). 

पण चेहऱ्यावर सतत केमिकल्सच्या ट्रिटमेंट घेतल्या तर त्यामुळे तात्पुरता उपाय होतो पण चेहऱ्याचा नैसर्गिक पोत खराब होतो. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च करावे लागतात. त्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी सौंदर्य मिळवता आले तर? क्लिंजिंग म्हणजेच चेहरा धुणे ही मेकअपमधील अतिशय महत्त्वाची पायरी असून चेहऱ्यावर जमा झालेली घाण निघून जाण्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. या क्लिंजिंगसाठी आपण एकतर साबण, फेसवॉश, क्लिंजर असे काही ना काही वापरतो. पण त्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक क्लिंजर तयार केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास मदत होते. पाहूयात हे क्लिंजर कसे तयार करायचे चेहऱ्यावर कसे लावायचे.

(Image : Google )

१. एका बरणीत एक चमचा मसूर डाळीचे पीठ, १ चमचा तांदळाचे पीठ आणि १ चमचा बेसन एकत्र करायचे. 

२. यामध्ये आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि सगळे चांगले एकजीव करायचे. 

३. काचेच्या बरणीत हे भरुन ठेवल्यास बराच काळ चांगले राहण्यास मदत होते. 

४. आपल्याला जेव्हा चेहरा धुवायचा आहे तेव्हा ही एकत्र केलेली पावडर घ्यायची आणि त्यामध्ये पाणी किंवा कच्चे दूध घालायचे. 

५. हे मिश्रण चेहऱ्याला लावायचे आण काही वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवायचा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणि चमक येण्यास मदत होते. 

६. चेहरा नितळ आणि उजळ हवा असेल तर हा उपाय रोजच्या रोज करायलाही हरकत नाही. साबण किंवा विकतचे फेसवॉश वापरण्यापेक्षा हा नैसर्गिक फेसवॉश वापरणे केव्हाही जास्त चांगले.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी