आपला चेहरा कायम उजळ आणि चमकदार दिसावा यासाठी आपण काही ना काही करत असतो. घरगुती उपायांना वेळ आणि थोडे कष्ट लागत असल्याने आपण बाजारात रेडीमेड मिळणारी उत्पादने वापरण्याला प्राधान्य देतो. ही उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या त्याची अतिशय बोलकी जाहिरात करत असल्याने आपणही या जाहिरातींना भुलतो आणि त्यातील अभिनेत्रींप्रमाणे दिसण्यासाठी आपण ही उत्पादने वापरण्यास सुरुवात करतो. यामध्ये असणारे रासायनिक घटक आपल्या त्वचेवर विपरीत परीणाम करतात आणि कालांतराने त्वचा उजळ दिसण्याऐवजी काळवंडलेली दिसते. तसेच ही उत्पादने महाग असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही मोजावे लागतात (Know How to make Skin Whitening bath powder at Home).
चेहऱ्यावर खूप पिंपल्स आल्याने सौंदऱ्यात बाधा? १ सोपा घरगुती उपाय, पिंपल्स होतील गायब...
फेसवॉश किंवा चेहरा धुण्याचा साबण हा आपल्या स्कीन केअर रुटीनमधील एक महत्त्वाचा घटक असतो. सकाळी झोपेतून उठल्यावर, आंघोळीच्या वेळी, बाहेरुन घरी आल्यावर आणि रात्री झोपताना आपण साधारणपणे चेहरा धुतो आणि त्यावेळी या फेसवॉशचा वापर करतो. यामुळे सुरुवातीला चेहरा उजळ दिसत असला तरी नंतर त्वचा कोरडी पडणे, ओढल्यासारखी वाटणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन फेस वॉश पावडर तयार केल्यास त्याचा चेहरा आणि एकूणच त्वचा उजळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होतो. ही पावडर कशी तयार करायची आणि चेहऱ्याला कशी लावायची हे समजून घेऊया...
१. संत्र्याची साले उन्हात वाळवून एका मिक्सरच्या भांड्यात घालावीत.
२. त्यामध्ये १ चमचा बेसन, १ चमचा हळद आणि वाटीभर वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात.
३. हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची एकसारखी पावडर तयार करावी.
केसांत कंगवा घातला की मोठा गुंता निघतो? घरीच करा १ सोपा उपाय, केसगळती होईल कमी...
४. ही पावडर एका बरणीमध्ये भरुन ठेवावी आणि आवश्यकतेनुसार वापरावी.
५. चेहरा किंवा संपूर्ण अंगासाठी आपण ही पावडर वापरु शकतो.
६. त्यासाठी एका बाऊलमध्ये १ चमचा पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा मध आणि अंदाजे दूध घालून सगळे एकत्र कालवून घ्यावे.
७. हे मिश्रण चेहऱ्याला किंवा अंगाला लावून २० मिनीटे ठेवावे आणि नंतर पाण्याने धुवून टाकावे.
८. यामुळे टॅनिंग जाण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते, हे सगळे नैसर्गिक असल्याने त्वचेला कोणताही त्रास होण्याचीही शक्यता नसते.