थंडीच्या दिवसांत हवेतील कोरडेपणामुळे आपली त्वचा खूप कोरडी पडते. अनेकदा तर कोरडेपणामुळे त्वचेला खाज येणे, त्वचेचा कोंडा पडणे अशा समस्या निर्माण होतात. त्वचेसोबतच ओठांची त्वचाही कोरडी पडते आणि सालपटे निघतात. कोरडे झालेले ओठ अतिशय वाईट दिसतात. म्हणून आपण ओठांना विकतचे महागडे लिप बाम लावतो. पण या लिप बाममध्ये नेमकं काय वापरलेले असते माहित नाही. तसेच या लिप बामची किंमतही खूप जास्त असते (know how to make Strawberry Lip Tint balm At Home).
तसेच हे लिप बाम थोडा वेळच टिकते आणि नंतर ओठ पुन्हा कोरडे पडायला लागतात. त्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पदार्थ वापरुन लिप बाम केल्यास त्याचा ओठांना मऊपणा येण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होतो. यामुळे ओठ दिर्घकाळ मुलायम राहण्यासही मदत होते. सध्या स्ट्रॉबेरीचा सिझन चालू असल्याने याच स्ट्रॉबेरीपासून अगदी झटपट आणि चांगले असे लिप बाम तयार करता येते. पाहूयात हे लिप नक्की कसे तयार करायचे....
१. एक स्ट्रॉबेरी घेऊन त्याचे बारीक तुकडे करायचे.
२. त्यामध्ये १ चमचा बिटाचा किस घालून हे सगळे चांगले कुटून घ्यायचे.
३. या दोन्हीपासून जो रस निघेल तो गाळणीने गाळून एका वाटीत काढायचा.
४. यामध्ये साधारण २ चमचे पेट्रोलियम जेली घालायची.
५. यात अर्धा चमचा खोबरेल तेल घालायचे.
६. पाहिजे असल्यास यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन इ कॅप्सुलही घालू शकता.
७. हे सगळे चांगले एकजीव करायचे आणि १० मिनीटांसाठी फ्रिजमध्ये ठेवायचे.
८. त्यानंतर हे लीप बाम तुम्ही कधीही वापरु शकता. यामुळे ओठ मऊ तर राहतातच पण स्ट्रॉबेरी आणि बीटामुळे त्याला थोडा लालसर रंग यायला आणि छान फ्लेवर यायला मदत होते.