Join us  

केसांची चांगली काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय? 4 टप्पे, केस राहतील कायम दाट-मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 9:47 AM

know how to start hair care for good hairs : पाहूयात केसांची काळजी घेताना कोणते टप्पे लक्षात घ्यावेत आणि नेमके काय करावे?

आपले केस खूप गळतात, पातळ झाले, रुक्ष झाले यांसारख्या तक्रारी बहुतांश महिला करतात. कधी कमी वयात केस पांढरे झाले म्हणून तर कधी केसांत खूप कोंडा झाला म्हणून महिला हैराण झालेल्या दिसतात. केसांची नीट काळजी घ्यायला पाहिजे हे तर आपल्याला कळत असते. पण केसांची काळजी घेण्याची सुरुवात नेमकी कुठून करावी हे आपल्याला कळत नाही. केस दाट, मुलायम आणि लांबसडक असावेत अशी साहजिकच प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण त्यासाठी काय आणि कसे करावे याबाबत मनात संभ्रम असतात. पण योग्य माहिती घेऊन व्यवस्थितपणे केसांची काळजी घेतली तर केसांचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होते. पाहूयात केसांची काळजी घेताना कोणते टप्पे लक्षात घ्यावेत आणि नेमके काय करावे (know how to start hair care for good hairs)?

१. त्वचेविषयी समजून घ्या...

केस धुतल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी केस तेलकट वाटत असतील तर तुमची त्वचा तेलकट आहे असे समजा. ३ ते ४ दिवसांनी तेलकट होत असतील तर ते सामान्य आहे. धुतल्यानंतर ३ ते ४ दिवसांनीही केसांची त्वचा तशीच असेल तर ती कोरडी आहे हे लक्षात घ्या. त्वचेला सतत खाज येत असेल तर ती सेन्सिटीव्ह आहे असे समजा. 

(Image : Google)

२. केस खूप कोरडे आणि रुक्ष होऊ नयेत म्हणून..

केस खूप भुरकट आणि कोरडे किंवा रुक्ष असतील तर केस धुण्याच्या १ ते २ तास आधी केसांना खोबरेल तेलाने चांगला मसाज करा. केसांचा कोरडेपणा कमी होण्यासाठी शाम्पू केल्यावर कंडीशनर लावण्यापेक्षा शाम्पू करण्याच्या आधी साधारण अर्धा तास कंडीशनर लावा. यामुळे केस मुलायम होण्यास मदत होईल. 

३. शाम्पू निवडताना...

केसांची मुळे कोरडी असतील तर सल्फेट फ्रि शाम्पूने आठवड्यातून २ वेळा केस धुवा. तेलकट केसांसाठी सॅलिसिलिक अॅसिड असलेला शाम्पू वापरा जेणेकरुन तेलाचे उत्पादन कमी होण्यास मदत होईल. खूप कोंडा असेल तर केटोकोनाझोल, झिंक पायरीथोन, सेलेनिअम सल्फाईड आणि सॅलिसिलिक अॅसिड असलेल्या शाम्पूने १ दिवसाआड केस धुवा.

४. केस धुतल्यानंतर..

कोरड्या-भुरकट केसांसाठी शाम्पूनंतर आवर्जून कंडीशनर लावायला हवा. केसांना पोषण देणारा हेअर मास्क आठवड्यातून एकदा आवर्जून वापरायला हवा.  ब्लो ड्रायर वापरत असाल तर हीट प्रोटेक्टंट वापरा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी