केस आपल्या सौंदर्यात भर घालते. लांब, काळेभोर, घनदाट केस कोणाला नाही आवडत. परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या निगडीत समस्या वाढत चालल्या आहेत. पावसाळ्यात केस गळतीची समस्या आणखी वाढते. केस गळती असंख्य कारणांमुळे होते. आहारात बदल किंवा केसांची योग्य निगा न राखल्यास ही समस्या अधिक वाढते.
केस गळती जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर, आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये ‘व्हिटामिन ई ’चा समावेश करून पाहा. व्हिटामिन ई हे एक अँटी-ऑक्सिडंट आहे, जे केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. व्हिटामिन ई मुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्यामुळे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते, व केस गळती थांबते(Know how to use vitamin E capsule for hair growth).
हेअर ग्रोथसाठी व्हिटॅमिन ई चा वापर
प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि वातावरणामुळे केसांचे नुकसान होते. ज्यामुळे केस गळू लागतात. स्काल्प आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी व्हिटामिन ई फायदेशीर ठरू शकते. यामुळे केसांमध्ये इलास्टिसिटी वाढते. यासह केसांच्या पृष्ठभागावर एक थर निर्माण होतो. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.
पावसाळ्यात चिखलांतून वाट काढताना पाय काळवंडले? ४ घरगुती उपाय- पाय दिसतील स्वच्छ
व्हिटामिन ई आणि एलोवेरा जेल
केसांसाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीत २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल जेल व २ चमचे एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. व ही पेस्ट केसांवर लावा. हा हेअर मास्क एक तासांसाठी केसांवर लावून ठेवा. त्यानंतर केस पाण्याने धुवा. यामुळे स्काल्प क्लिन होईल, व केसांची वाढ होईल.
व्हिटामिन ई आणि एरंडेल तेल
एरंडेल तेल केसांसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे. त्यात व्हिटामिन ई जेल मिसळल्याने, केसांना मुळापासून टोकापर्यंत पोषण मिळते. यासाठी एका वाटीत २ व्हिटामिन ई कॅप्सूल जेल व एरंडेल तेल घालून मिक्स करून केसांना लावा. व स्काल्पवर मसाज करा. आठवड्यातून एकदा या तेलाने मसाज केल्याने केस गळती थांबेल.
रात्री केस मोकळे सोडून झोपावे की बांधून? केस मोकळे सोडले तर काय बिघडते..
व्हिटामिन ई आणि कांद्याचा रस
कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जात. त्यातील गुणधर्म केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. यासाठी एका वाटीत २ व्हिटामिन ई कॅप्सूल जेल व कांद्याचा रस घेऊन मिक्स करा, व ही पेस्ट केसांवर लावा. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतील.