Join us  

Know the Yami Gautam’s Beauty Secret : यामी गौतम रोज सकाळी न चुकता पाण्यात घालून पिते चिमूटभर.. तिच्या नितळ त्वचेचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 2:18 PM

Know the Yami Gautam’s Beauty Secret :यामी गौतमच्या सौंदर्याचं रहस्य, दररोज करते ही एक गोष्ट...

ठळक मुद्देसौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही उपाशी पोटी हळद पाणी पिणे उपयुक्त ठरते. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या हळदीचा आरोग्यासाठी अनेक मार्गाने उपयोग होतो

प्रसिद्ध अभिनेत्री यामी गोतम तिच्या सौंदर्यासाठी कायम चर्चेत असते. तिच्या नितळ त्वचेमागे काय रहस्य आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना कायम पडतो. तर तिची त्वचा इतकी नितळ असण्यामागे एक रहस्य आहे, जे नुकतेच समोर आले आहे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुम्ही कोणती गोष्ट घेता यावर तुमचे आरोग्य आणि सौंदर्य अवलंबून असते असे म्हटले जाते. यामी गौतमीने नुकतेच तिचे मॉर्निंग रुटीन काय असते याविषयी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यामी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत (Know the Yami Gautam’s Beauty Secret). तिचे ब्यूटी सिक्रेट जाणून घेण्यासाठी तर तमाम तरुणी उत्सुक असतात. 

(Image : Google)

तर यामी सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि त्यात हळद घालून घेते. हिमाचलमध्ये आपल्या घरच्या शेतात पिकवलेली ताजी हळद असल्याचेही ती सांगते. यावेळी आपल्या कोमट पाणी आणि हळदीचा फोटोही ती सोसल मीडियावर पोस्ट करते. हळद आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून आरोग्याच्या विविध तक्रारींवरील उत्तम उपाय ठरते. घरात सहज उपलब्ध असलेल्या हळदीला आयुर्वेदात बरेच महत्त्व असून अनेक औषधांमध्येही हळदीचा वापर केला जातो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हळद आणि कोमट पाणी घेणे हा उत्तम उपाय असल्याचे म्हटले जाते. 

हळद पाण्याचे फायदे 

१. शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. हळदीमध्ये असणारे अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी व्हायरल घटक आपल्याला विविध इन्फेक्शन्सपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय जखम बरी होण्यासाठीही हळदीचा उपयोग केला जातो. आपल्याला चीर पडली असेल किंवा काही कापले असेल तर त्याठिकाणी इन्फेक्शन होऊ नये म्हणून हळद लावणे उपयुक्त ठरते. 

२. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी हळद अतिशय चांगला पर्याय आहे. त्वचेतील पेशींना पुनरुज्जीवन देण्यासाठी आणि नैसर्गिक उजळपणा वाढवण्यासाठी हळद महत्त्वाचे काम करते. नियमित हळद पाणी प्यायल्याने त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण तर होतेच पण ती आरोग्यदायी राहण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. हळद पाणी प्यायल्याने यकृताचे काम सुरळीत होऊन त्यामध्ये साचलेले अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे यकृताशी निगडित तक्रारी दूर होण्यास हा उपाय चांगला आहे. यकृतात जाणारे रक्त शुद्ध करण्याचे काम हळद पाण्याद्वारे केले जात असल्याने याचा शरीराला फायदा होतो. 

४. वजन कमी करण्यास तसेच अपचनाची समस्या दूर करण्यास हळद पाण्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही उपाशी पोटी हळद पाणी पिणे उपयुक्त ठरते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीयामी गौतम