Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा तर करा स्लॅप थेरपी! म्हणजे डायरेक्ट फटके? पाहा काय हा प्रकार..

चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा तर करा स्लॅप थेरपी! म्हणजे डायरेक्ट फटके? पाहा काय हा प्रकार..

Korean Beauty Secret: त्वचेचे सौंदर्य वाढवायचे असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा... पहा तरी स्लॅप थेरपी (slap therapy for skin) हा नेमका प्रकार आहे तरी काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 07:35 PM2022-05-31T19:35:55+5:302022-05-31T19:36:35+5:30

Korean Beauty Secret: त्वचेचे सौंदर्य वाढवायचे असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा... पहा तरी स्लॅप थेरपी (slap therapy for skin) हा नेमका प्रकार आहे तरी काय..

Korean Beauty Secret: Slap therapy for glowing flawless and radiant skin | चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा तर करा स्लॅप थेरपी! म्हणजे डायरेक्ट फटके? पाहा काय हा प्रकार..

चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा तर करा स्लॅप थेरपी! म्हणजे डायरेक्ट फटके? पाहा काय हा प्रकार..

Highlightsकोरियन स्किनचं हे आणखी एक ब्यूटी सिक्रेट आहे, असं म्हणतात. त्यामुळे सध्या जगभरातच हा ट्रेण्ड चांगलाच व्हायरल होत आहे. 

चेहरा अधिक चमकदार, तजेलदार व्हावा, चेहऱ्यावर नॅचरली छान ग्लो (glow) यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स (pimples) येऊन त्यांचे काळे राहू नयेत, म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने तर आपण लावतोच, पण त्यासोबतच वेगवेगळे घरगुती उपायही करून पाहतो. आता त्याच्या जोडीलाच हा आणखी एक उपाय करून बघा. कोरियन स्किनचं हे आणखी एक ब्यूटी सिक्रेट (korean beauty secret) आहे, असं म्हणतात. त्यामुळे सध्या जगभरातच हा ट्रेण्ड चांगलाच व्हायरल होत आहे. 

 

स्लॅप थेरपी म्हणजे काय...(what is slap theorapy?)
नाव वाचून अजिबात घाबरू नका. एखाद्याला तोंडात मारावं, असं काही आपल्याला यात करायचं नाही. स्लॅप थेरपी करण्यासाठी तुमच्या दोन्ही हातांच्या बोटांनी तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर अलगद टॅपिंग करा. अर्थात ते खूप हळूवारही करू नका आणि खूप जोरातही करू नका. बोटांनी मारल्यावर आवाज येईल, इतपत जोरात टॅप करावं. संपूर्ण चेहऱ्यावर अशा पद्धतीने ५ ते ७ मिनिटे टॅपिंग करणं म्हणजे स्लॅप थेरपी होय... हे करताना सगळ्यात आधी चेहरा गरम पाण्याने धुवून घ्या. स्वच्छ पुसून कोरडा करा. त्यानंतर तुम्ही जे मॉईश्चरायझर लावता ते चेहऱ्यावर लावून घ्या आणि त्यानंतर ही थेरपी घ्या. 

 

स्लॅप थेरपी करण्याचे फायदे
१. त्वचा होते चमकदार

कोरियन महिला खूप जुन्या काळापासून ही थेरपी वापरतात, असं सांगितलं जातं. चेहऱ्यावर दररोज ठराविक वेळ टॅपिंग केल्याने त्वचेमध्ये होणारा रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. यामुळे साहजिकच त्वचा अधिक तुकतुकीत होऊन चमकदार दिसू लागते.

 

२. अकाली सुरकुत्या येणं थांबतं
जगभरात या थेरपीला ॲण्टी एजिंग थेरपी म्हणून ओळखलं जातं. चेहऱ्यावर हलक्या हाताने टॅपिंग केल्याने त्वचेला मसाज केली जाते. याचा परिणाम त्वचेचा पोत सुधारण्यात होतो. त्वचेवर टॅपिंग केल्यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर दिसू लागलेल्या फाईन लाईन्सही कमी होतात आणि चेहरा अधिक तरुण दिसतो. 

 

३. पिंपल्सची समस्या कमी होते
टॅपिंग केल्याने रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. त्यामुळे टॉक्झिन्स त्या जागेवरून बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे पिंपल्स येण्याचे आणि चेहऱ्यावर त्यांचे डाग पडण्याचे प्रमाण आपोआप कमी होते. 

 

Web Title: Korean Beauty Secret: Slap therapy for glowing flawless and radiant skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.